पांढरकवडा : शिवाजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या संयुक्त जयंती उत्सव समितीतर्फे समाज प्रबोधन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
गोटूल इंग्लिश मीडियम स्कूलच्या पटांगणावर माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात शिवव्याख्याते समीर नगुळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या जीवन चरित्रावर सखोल प्रकाश टाकला. शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा लोकांमध्ये रुजवून त्यांचे समाजकार्य लोकांमध्ये घराघरात पोहोचवण्याचे काम संत गाडगेबाबा यांनी केले. गाडगेबाबा हे चालते बोलते विद्यापीठ होते असे प्रतिपादन यावेळी समीर लेनगुळे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अण्णासाहेब पारवेकर होते. कार्यक्रमाचे उद्घाटन शंकर बडे यांनी केले. या कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश मानकर, विजय पाटील, रितेश परचाके, विजय गोडे, वसीम जाफर सैय्यद, वर्षा ठाकरे, प्रेरणा उगले, अनिल किनाके, वासुदेव शेंद्रे, सुरेश बोलेनवार, बंडू सोयाम, धीरज येलचलवार आदी उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय कार्यक्रमाचे आयोजक शुभम वरगंटवार यांनी करून दिला. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत सोयाम यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता व्विाजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या संयुक्त जयंती उत्सव समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.