लोणार स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त किन्ही येथे प्रा डॉ शिवानंद भानुसे ( प्रदेश प्रवक्ते संभाजी ब्रिगेड) यांचे शिवचरित्रावर व्याख्यान झाले. या कार्यक्रमात गावातील व पंचक्रोशीतील शेकडो बंधू-भगिनींनी हजेरी लावली होती. छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून व जिजाऊ वंदना गाऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला कु भक्ती फड या मुलीने शिवरायांच्या गीतावर सुंदर असे नृत्य सादर केले.
याप्रसंगी बोलताना शिवानंद भानुसे पाटील यांनी सांगितले की शिवरायांच्या इतिहासातून आजच्या तरुणांनी ही स्फूर्ती घ्यायची की आपण ज्या ज्या क्षेत्रात जाल त्या त्या क्षेत्रातील शिवाजी व्हायचं! म्हणजेच प्रचंड मिळवायचं. आता तलवारीची लढाई यश नाही तर लेखणीची लढाई अशाप्रकारे
लढायची. शिवचरित्रातील अनेक उदाहरणे व प्रसंग सांगून त्यांनी समाजाने का करायला पाहिजे व काय करू नये हे आपल्या व्याख्यानातून सांगितले. तसेच शिवरायांनी सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन व मावळा हे एकच नाव देऊन स्वराज्य स्थापन केले. जात- पाच पाहून नाही तर त्यांचे कर्तुत्व पाहून त्या त्या व्यक्तीला पदे दिली असे सांगितले. सदर कार्यक्रमासाठी उपसरपंच अमोल चव्हाण यांच्यासह हेमंत पाटील, रमेश चव्हाण, गजानन तनपुरे, गजानन इंगोले, महेंद्र तनपुरे, कैलास घायाळ, पवन चव्हाण ज्ञानेश्वर तनपुरे, शिवाजी चव्हाण, गजानन नागरे, आकाश चव्हाण, निलेश चव्हाण, राजू इंगोले यांचे अंशुमन इंगोले यांचे सहकार्य लाभले या वेळी आनंदराव चनखोरे, बळीभाऊ मापारी ऋषी जाधव भागवत मापारी, भूषणभाऊ मापारी, विनोदभाऊ बाघ, जितुभाऊ सानप, संदीप मापारी, नानासाहेब खंदारे, डॉ. विक्रांत मापारी, उमेश देशमुख (B.D.O.), कडाळे, घारोड, घायाळ, विलास पडघान, इंगोले, ग्रामसेवक तांगडे मॅडम, तलाठी इप्पर इत्यादी मान्यवरांची उपस्थिती लाभली. सदर कार्यक्रमाचे संचालन शिवश्री अशोकराव ढोणे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा चव्हाण यांनी केले.