नवीन नांदेड, ता. २६: छत्रपती शिवाजी महाराज सर्व जातीधर्माला सोबत घेऊन जालत होते. त्यांचे कार्य मानवतावादी होते, असे मत या वेळी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी मांडले. संभाजी ब्रिगेड आयोजित शिवजन्मोत्सवानिमीत्त सिडको जिजाऊ सृष्टी येथे प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता.
अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, उद्घाटक म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे, संपर्कप्रमुख बबनराव थोरात, वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते फारुख अहेमद, सहसंपर्कप्रमुख भुजंग पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा संपर्कप्रमुख उमाकांत उफाडे, जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे, माधव पावडे, बबन बारसे, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष भगवान कदम, वंचित बहुजन आघाडीचे महानगराध्यक्ष विठ्ठल गायकवाड, आयुब खान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी जिल्हा संघटक वच्छला पुयड, शहरप्रमुख जितुसिंघ टाक, जिजाऊ ब्रिगेडचे उपाध्यक्ष सरस्वती धोपटे आदींची या वेळी उपस्थिती होती. देश, लोकशाही, संविधान वाचविण्यासाठी शिवसेना-संभाजी ब्रिगेड - वंचित बहुजन आघाडीच्यासोबत निस्वार्थपणे उभे राहावे लागेल असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते फारुक अहेमद यांनी मत मांडले. संभाजी ब्रिगेडने ठेवलेला हा प्रबोधन मेळावा पुठील वाटचालीसाठी दिशा देणारा ठरेल असे मत संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी मांडले.
प्रास्ताविक आयोजक संभाजी ब्रिगेड विभागीय अध्यक्ष संकेत पाटील आभार जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे यांनी मांडले. दिपक भरकड, गजानन पवार, गजानन शिंदे, भुजंग जाधव, बालाजी देशमुख, मयुर अमिलकंठवार, राम मोरे आदिंसह इतरांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.