शिरपूर - जातनिहाय जनगणनाचा ग्रापंचायतस्तरावर सर्व्हे करणारे ढोरखेडावासी आदर्शच असल्याचे, प्रतिपादन राष्ट्रीय पिछडा वर्ग ओबीसी मोर्चा नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी विकास पटेल यांनी केले. ते ढोरखेडा ग्रामपंचायत येथे बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, या वेळेस होणाऱ्या जनगणनेत जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, यासह ओबीसींच्या विविध प्रश्नांवर जनजागृती, ईव्हीएम घोटाळ्याबाबत लोकलागृत्ती यासह विविध ज्वलंत प्रश्नाकडे लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी 21 जानेवारीला नागपूरपासून प्रदेशव्यापक परिवर्तन यात्रा सुरू केल्याची माहिती दिली. ग्रापस्तरावर ढोरखेडा ग्रापने जातनिहाय जनगणनाचा सर्व्हे केल्याबद्धल गावकऱ्यांचे कौतुक केले. बहजन मुक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत होवाळ यांनी ईव्हीएम घोटाळ्याबाबत आपल्या भाषणामधून जनजागृती केली. आयएमपीए संघटनेचे जिल्हाध्यक्ष विचारवंत डॉ. रवी जाधव, ज्येष्ठ मार्गदर्शक मिलिंद सुर्वे, राष्ट्रीय पिछडा वर्ग ओबीसी मोर्चाचे राज्य महासचिव सिताराम वाशीमकर, जिल्हाध्यक्ष प्रल्हाद पौळकर ह्यांची समयोचीत भाषणे झालीत. आपले सरपंच बबन शंकरराव मिटकरी, माजी सरपंच डॉ. मदन मिटकरी, उपसरपंच राजू सावळे, शामराव सावले, आर. के. सावळे, अमोल जुंगाडे, पांडूरंग सावले, जनार्दन इढोळे आदी ग्राप सदस्य, किसन महाराज सावले, गजानन सावले, तुळशीराम जुंगाडे, सिताराम महाराज शेजूळ, सिताराम सावले, सोपान सावले, महादेव सावले, पांडूरंग सावले, कडू मिटकरी, गंगाराम सावळे, पांडूरंग सावळे, पांडूरंग मिटकरी, गौतम सावळे, ज्ञानेश्वर सावले यासह ओबीसी बांधवासह गावकरी मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन तथा आयोजन राष्ट्रीय पिछडा वर्ग ओबीसी मोर्चाचे मालेगाव संदीप मिटकरी तालकाध्यक्ष यांनी केले.