चंद्रपूर : चंद्रपूर येथे दिनांक १० फेब्रुवारी पासून कृषी महोत्सवाचे आयोजन चांदा क्लब ग्राउंड, चंद्रपूर येथे करण्यात आलेले आहे . यात विविध स्टॉल लावण्यात आलेले आहेत. ओबीसी सेवा संघातर्फे मुख्यमंत्र्यांना ओबीसी जनगणनेसाठी शपथ पत्र पाठविणारा स्टॉल ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. अनिल डहाके, महासचिव विलास माथनकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेला आहे. ओबीसी सेवा स्टॉलचे उद्दघाटन संघाच्या संदीप गिऱ्हे, जिल्हाप्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या हस्ते झाले. यावेळी विनय धोबे, पवन राजूरकर, अनिकेत दुर्गे, खुशाल काळे, सुरज दहेगांवकर, मयूर सोनपितरे, गौरव झाडे, राजेश ओबीसी जनगणनेसाठी खासदार बाळूभाऊ धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले शपथपत्र आंबेकर, हनुमान बेरड, युवराज बांबोडे, प्रशिक नागदेवते, हर्षल कारमेंगे, सूरज गेडाम, प्रलय म्हशाखेत्री, प्रित म्हशाखेत्री, विशाल शेंडे, विपुल देऊळकर उपस्थित होते.
बिहार राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात सुद्धा ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यात यावी या आशयाचे ५ हजार शपथपत्र पाठविण्याचा मानस आहे. ओबीसी जनगणनेसाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी यासाठी हा प्रयत्न करण्यात येत आहे.
पत्राचा नमुन्यात
जय महाराष्ट्र, जय ओबीसी
मी शपथ घेतो की, बिहार राज्याप्रमाणे महाराष्ट्रात ओबीसींची स्वतंत्र जातनिहाय जनगणना झाली माझा परिवार नाही तर मी व आपल्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करणार नाही. अशा प्रकारचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहे. सोबतच सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला आहे. या स्टॉलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मोठ्या प्रमाणात याला प्रतिसाद मिळत आहे. समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे. खासदार बाळूभाऊ धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, ?ड. पुरुषोत्तम सातपुते तसेच सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी स्टॉलला भेट देवून शपथ पत्र पाठवले. या पत्राची दखल घेऊन ओबीसींची जनगणना केली नाही तर येत्या काळात गावागावात जाऊन ओबीसींची जनगणना नाही, तर आपल्या पक्ष्याला मतदान करणार नाही अशी सार्वजनिक शपथ घेणार आहे. असे आवाहन ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. अनिल डहाके यांनी केले आहे.
ओबीसी जनगणने साठी चंद्रपूरातून ५००० शपथ पाठवणार आहे. बिहार प्रमाणे महाराष्ट्रात ओबीसींची स्वतंत्र जातनिहाय जनगणना करावी. सरकारने ओबीसी जनगणना केली नाही तर माझ्या सह अनेक ओबीसी बांधव राज्यातील सरकारला मतदान करणार नाही.
प्रा. अनिल डहाके, जिल्हाध्यक्ष, ओबीसी सेवा संघ, चंद्रपूर