ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन दिनांक २३ ते २६ फेब्रुवारी २०२३ ला हैद्राबाद येथे होणार आहे. त्या अधिवेशनात प्रतिनीधी पाठविण्यासाठी तसेच महाराष्ट्र राज्याची कार्यकारणी निवडण्यासाठी ४ फेब्रुवारी २३ रोजी हॉटेल रामगीरी इंटरनॅशनल अमरावती येथे महाराष्ट्र राज्य अधिवेशन आयोजीत करण्यात आले होते. सदर अधिवेशनात पक्षाचे केंद्रीय सचिव व महाराष्ट्र राज्य निमंत्रक जी. देवराजन उपस्थित होते. याबरोबर राज्यभरातुन विविध जिल्ह्यातुन मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या अधिवेशनाला संबोधित करतांना पक्षाचे केंद्रीय सचिव जी. देवराजन यांनी फॉरवर्ड ब्लॉकचा इतिहास सांगीतले की, आज देशाला प्रगतीसाठी फक्त आणि फक्त समाजवाद व राष्ट्रवाद या नेताजीच्या विचारसरनेची गरज आहे. ते आम्ही सर्वांनी जनतेपर्यंत नेले पाहीजे देशाचे गणतंत्र हे भांडवलदारीकडे नेण्याचे दुशकर्म भाजपा करत आहे. प्रस्थापीत राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणाला विरोध करणाऱ्यालाच वामपंथी म्हटले जाते. फॉरवर्ड ब्लॉक ही एक वामपंथी पार्टी आहे नाही की, कम्युनिस्ट कम्युनस्झम आणि सोशलीझम हे एकत्र नाही. फॉरवर्ड ब्लॉक सोशालीस्ट विचारसाना आहे अस त्यांनी आपल्या भाषणात संबोधीत करतांना सांगीतले. महाराष्ट्र राज्य कार्यकारणीत महासचिव म्हणून डॉ. अंकुश नवले यांची निवड करण्यात आली व तसेच अध्यक्षपदी कॉ. किशोर कर्डक यांची नेमणुक करण्यात आली. याशिवाय ७ सचिव व १६ सदस्य कार्यकारणीमध्ये निवडण्यात आले. किसान सभेची बांधणी हे दिनकररराव चव्हाण व डॉ. धर्मराज राऊत करतील. डॉ. भुषण पोतदार यांच्या नेतृत्वात युथ विंग उभारण्याचे ठरविण्यात आले, यावेळी डॉ. भुषण पोतदार यांनी युवकांना फॉरवर्ड ब्लॉकशी जुडण्याचे आव्हाहन करत सुभाषीझम या विचारधारेची लाट तरुन रक्तात ज्वलंत करण्याची प्रतीज्ञा घेत देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्वप्नातील गौरवशाली भारत निर्माण करण्यासाठी विदर्भासह पुर्ण महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात फॉरवर्ड ब्लॉक च्या सिंहाची डरकाळी फोडण्याचे आव्हाहन महाराष्ट्रातल्या समस्त तरुणांना केले. यावेळी उपस्थित संपूर्ण राज्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित
होते.