वर्धा - राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरीत ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मोठ्या थाटात १३ फेब्रुवारी रोजी उद्घाटन करण्यात आले. शहरात ग्रंथदिंडी काढण्यात आली. त्यात साहित्यिकांचा अभाव आणि विद्यार्थ्यांची गर्दी दिसून आली. यामुळे वर्धेकरांना प्रश्न पडला की साहित्यिकांनी या साहित्य संमेलनाला पाठ तर नाही ना फिरवली? वर्धा नगरीत दुसरे १७ वे विद्रोही साहित्य संमेलन शहरातील सर्कस मैदानावर ४ फेब्रुवारी रोजी उद्घाटन दरम्यान एकनाथ शिंदेची वेशभूषा घेऊन अवतरलेल्या कार्यकत्यांनी उपस्थितांचे लक्ष्य वेधले. या विद्रोही साहित्य संमेलनात मोठ्या प्रमाणात साहित्यिकांनी उपस्थित दर्शवली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला साहित्यिकांची गर्दी कमी दिसून आले. संमेलन स्थळी मोठ्या प्रमाणात शासकीय कर्मचारी तर तुरळक साहित्यिक दिसून आले. तर सर्कस ग्राऊंड परिसरात विद्रोही साहित्य संमेलनाला मोठ्या प्रमाणात नागरिक तसेच साहित्यिकांची गर्दी दिसून आली. असे या दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या साहित्य संमेलनात दिसून आले.
राज्यात ईडी सरकार आल्यापासून खोक्यांचा विषय चर्चेला आला त्याची पुनरावृत्ती वर्ध्यात आयोजित १७ वे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनात एका कार्यकर्त्यांने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेशभूषा साकारून संमेलन मंडपात सोबत काही कार्यकर्त्यांना घेऊन गळ्यात खोके लटकून फिरले आणी ५० खोके एकदम ओक्केच्या घोषणा दिल्या. संमेलनस्थळी ही बाब लक्षवेधक ठरली.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan