लक्ष्मणरावजी सोनार: हे सत्यशोधक मताचे गृहस्थ होते. त्यांच्याचघरी सावित्री बाईच्या दुसऱ्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले होते. त्यांची दोन्ही मुले गोपाळराव व कृष्णाजी सत्यशोधक चळवळीत कार्य करीत होते. कृष्णाजींच्या करजगावातील वाड्यात सत्यशोधक समाजाची पहिली सभा नारोबाबा महाधट शास्त्री पानसरे व धर्माजी रामजी डुंबरे पाटील, ओतुरकर यांनी घेतली होती. लक्ष्मण शास्त्री सोनार यांचा मृत्यू २९-१०-१०१० साली झाला. तर गोपाळरावांचा मृत्यू ०६-१०- १९१२ साली झाला.
भगवंतराव कांडलकरः भगवंतराव बाळाजी कांडलकर यांनी सत्यशोधक समाजाचे फार मोठे काम केले. ते वऱ्हाडी प्रांताचे अध्यक्ष होते. त्यांच्या घरीच सत्यशोधक समाजाचे करजगावातील मुख्य कार्यालय होते. भगवंतरावांचा सत्यशोधक अधिवेशनात सहभाग होताच तसेच माळी शिक्षण परिषदेमध्ये सुद्धा ते हरिरीने कार्य करीत. दुसऱ्या मुंबई येथे पार पडलेल्या १९११ सालच्या परिषदेचे ते अध्यक्ष होते. सत्यशोधक समाजाच्या कार्यकारी मंडळाचे ते उपाध्यक्षही होते. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच करजगावातील सत्यशोधक समाज वाटचाल करीत होता. भगवंतराव बाळाजी कांडलकर यांचा मृत्यू १९३० साली झाला.
अमृतराव कृष्णाजी चौधरी: हे एक श्रीमंत, शिक्षणप्रेमी व सत्यशोधक समाजाचे कट्टर अनुयायी होते. ते व्यवसायाने पटवारी होते. त्यांच्या घरी मिळालेल्या छायाचित्रावर सत्यशोधक असे स्पष्ट छापलेले दिसते. त्यांनी अमृतगीता ना- वाचा काव्यसंग्रह १९०७ साली लिहिला. १९१८ साली तो विद्यासागर छापखाना अमरावती येथे प्रकाशित केला. त्यांच्या पत्नी सुमंतादेवी यांनी त्याचे जीवनचरित्र काव्यरूपाने वर्णन करुन अमृतभजन भाग-१, भाग- २ असे १९१७ मध्ये करजगावात प्रकाशित केले. अमृतगीता नावाचा काव्यग्रंथ भाऊसाहेब मांडवकर यांनी पुन्हा नव्याने संपादीत केले आहे. त्यांच्यावर कृष्णराव भालेकर यांचा मोठा प्रभाव होता.
शंकरराव बाळाजी पाटील म्हाला: शंकरराव पाटील यांनी सत्यशोधक चळवळीमुळे शैक्षणिक कार्य केले. व सत्यशोधक समाजात काम करणाऱ्यांना बळ दिले. शंकरराव पाटील यांच्या वडीलांजवळ पाटीलकीचे वतन होते. त्यांचे लग्न पार्वतीबाई उर्फ अलोकाबाई नावाच्या मुलीशी झाले. त्यांना एकच मुलगी होती. तिचे नाव अंजनी. त्यांच्या कृष्णाजी कर्काजी चौधरी यांच्याशी संबंध आला व त्यांच्याशी गाठ मैत्री झाली. या दोघांनीही स्वतःच्या मुलींना शाळेत घातले. शंकररावांनी लायब्ररी, छापखाना यासाठी भरपूर मदत केली. गावात शाळा नसल्याची त्यांना खंत होती. ती त्यांना गावात शाळा काढून पूर्ण केली. शाळेचे नाव ए.व्ही.स्कूल होते. पुढे त्याच शाळेचे नाव श्री शंकरराव ए. व्ही. स्कूल ठेवण्यात आले. या शाळेसाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने त्यांचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण केले. आज या शाळेची इमारत गावाच्या दर्शनी भागास असून ती गावाच्या वैभवात भर घालते. गणपतराव शिवरामजी सोनार हे श्रीमंत गृहस्थ असले तरी त्यांना समाज शिक्षणाची तळमळ होती. ते स्थानिक सत्यशोधक समाजाचे सभासद होते. करजगावच्या सामाजिक व शैक्षणिक विकासाकरिता त्यांनी काम केले. दुष्काळात त्यांनी गोरगरीबांच्या उदरनिर्वाहाची सोय लावली होती. त्यांचे कनिष्ठ पुत्र डॉ. भाऊसाहेब सोनार हे फार मोठे राजकीय दृस्य म्हणजे पुढे आले. ते मध्यप्रांत वऱ्हाड सरकारचे विधीमंत्री होते. मारोतीराव सोनाजी चौधरी उर्फ नाना पाटील शंकरराव पाटील व अमृतराव कृष्णाजी चौधरी यांच्यासोबत सामाजिक शैक्षणिक कार्यात ते काम करीत. ते मराठा शिक्षण परिषदेला उपस्थित राहत. त्यामागे सत्यशोधकी प्रेरणाच होती.
मारोतराव पुजांजी कोरडे हे सुद्धा सत्यशोधक चळवळीचे काम करीत होते. त्यांच्या जन्म १८९७ ला झाला. तर मृत्यू २३ जून १९५३ ला झाला. त्यांचे पुत्र विनायकराव कोरडे हे महाराष्ट्र शासनाचे मंत्री होते. तर ते दोन वेळा अचल- पूर मतदारसंघाचे आमदार होते. त्यांनी गावाच्या नावलौकीकात भर घातली. यामागे सत्यशोधकी प्रेरणाच होती.
मोतीराव भगवतराव कांडलकर: हे सत्यशोधक समाजाचे सक्रीय कार्यकर्ते होते. तसेच लोकसेवक सुद्धा होते. सहकारी तत्वावर त्यांची गाढ निष्ठा होती. त्यांनी करजगावात सर्वप्रथम सहकारी पतपेढी काढली. तिची स्थापना १९ जून १९२० ला केली. ते १९२९ - १९५० पर्यंत करजगावचे सरपंच होते. सत्यशोधक परिषद, माळी शिक्षण परिषद यामध्ये ते सहभागी होते. त्यांचे ११-१०- १९५० ला निधन झाले. मोतीराव तुकाराम वानखडे: मोतीराव तुकारामजी वानखडे हे सत्यशोधक चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते व नेते होते. कृष्णाजी कर्काजी चौधरी आणि मो. तु. वानखडे अशी ही सत्यशोधक चळवळीतील गाजलेली जोडी होती. त्यांचा स्वयंपुरोहित नावाचा ग्रंथ फार गाजला. त्या ग्रंथाच्या तेरा आवृत्या निघाल्या, त्याशिवाय त्यांनी इतरही सत्यशोखक विचारांचे साहित्य लिहिले.
१) संगीत शेतकऱ्यांची गोफण (१९०३) २) संगीत सत्यशोधक चाबुक (१९०८) ३) सत्याचा शोध (१९०९) ४) स्वयंपुरोहित अथवा पुजा पद्धती (१९०५) ५) संगीत भटांचे थोतांड खंडण (सत्यथ प्रदीप ) (१९०५) ६) ब्राम्हण आणि बहिष्कार ( १९१४) ७) ब्राम्हणांचा हक्क नाही अशाबद्दल हायकोर्टात झालेले ठराव ( चौथी आवृत्ती १९२९) ८) पवित्र कोण ब्राम्हण की न्हावी ? (पाचवी आवृत्ती - १९२३) ९) सत्यशोधकी ठराव (संपादक) (१९११) १०) वानखडे यांचे खान्देशातील भाषण (१९२९), ११) संत सावता माळ्याचे अभंग (संपादक) (१९१९), १२) सावता माळी यांचे अल्पचरित्र (१९२१), १३) गायत्री मंत्र व्याख्यान, १४) वेदाचार प्रकाशक १५) इश- रा १६) पेशवाईतील जुलमाचा पोवाळा १७) सत्यशोधकांचा शंकराचार्याशी सामना. त्यांची काही पुस्तके उपलब्ध नाहीत.
त्यांनी व त्यांची प्रकाशित केलेली सर्व पुस्तके खूप गाजली. सत्यशोधक चळवळीत इतके विपुल लेखन पुस्तक रूपाने क्वचीतच कुणी केले असेल त्यांचा स्वतःचा सत्योदय छापखाना होता. त्यांच्या पत्नीचे नाव मालनबाई (माहेरचे नाव सखुबाई) त्यांना एक मुलगा होता त्याचे नाव अण्णा, ते मिल्ट्रीत होते व त्यांनी तेथून आल्यानंतर वैद्यकीय व्यवसाय केला. त्यांचा जन्म १-७-१९०९ ला झाला. मोतीरावांच्या जन्माची तारीख उपलब्ध नाही. शेतजमीन विकून त्यांनी छापखाना घेतला होता. सत्यशोधक समाज परिषदा, ब्राम्हनंतर पक्ष, माळी शिक्षण परिषदा यामध्ये त्यांचा फार मोठा सहभाग होता. करजगावात सत्यशोधक समाज स्थापन झाला तेव्हापासून ते त्यामध्ये कार्य करीत होते. माळी शिक्षण परिषदेच्या चहार्डी येथील १० व्या परिषदेचे अध्यक्ष होते. ते उत्तम खर्डे वक्ते आणि संशोधक लेखक होते. नगर काँग्रेस कमिटीतही ते अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. क्षत्रीय माळी पुढारी या मासिकाचे ते संपादक होते. चरखा संघ, सॅनिओशन कमिटी, बहेरम कॉन्फरंस इ. संस्थेतही त्यांनी काम केले. १९५०-१९५३ च्या दरम्यान मृत्यू झाला.
मालनबाई मोतीराव वानखडे: मालनबाई मोतीराव वानखडेयांच्या पत्नी होत. आपल्या पतीप्रमाणेच त्याही समाजकार्य करीत होत्या. त्या शिक्षणप्रेमी व दानशूर होत्या. विदर्भ माळी भगीनी मंडळाच्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या. त्या मोतीराव वानखडे यांच्या सत्यशोधक कार्यात सहभागी होत असत.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan