चंद्रपूर : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे दि. २८ मार्च २०२३ रोजी दिल्ली येथे जंतर-मंतर मैदानावर भव्य निदर्शने करण्यात आले आहे. ओबीसी समाजाच्या संविधानीक मागण्या केंद्र सरकारनी लवकरात लवकर सोडवाव्यात या करिता राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून निदर्शने करण्यात आली.
या आंदोलनात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी ओबीसींच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा खुर्ची सोडा, असे व्यक्तव्य केले. यावेळी आंदोलनात राज्यसभा सदस्य बिधा मस्तान राव, राज्यसभा सदस्य बदूगुक लिंगया यादव, राज्यसभा सदस्य विधीराज रविचंद्र, राज्यसभा सदस्य मोपिदेवी वेंकटरमण, महासचिव सचिन राजूरकर, विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे, प्रोफेसर जोगेंद्र कवाडे, हरियाणा से राजबाला सैनी, नेपालचे विर बहाद्दूर महतो, तेलंगानाचे श्रीनिवास जाजुला, आंध्रप्रदेशचे शंकरअण्णा, युवा राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष घाटे, बिहारचे मुकेश नंदन, शिव प्रसाद साहू, रजनीश गुप्ता, प्रकाश साबळे, नरेश शाहू, मध्यप्रदेश के विनय कुमार, दिल्ली के हंसराज जांगिड, चेतन शिंदे, प्रा. रविकांत वरारकर, विक्रम गौड, मधुबाला यांची उपस्थिती होती. या वेळी देशभरातील विविध राज्यातून विविध ओबीसींच्या संघटनाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
केंद्रात स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापित करण्यात यावे, क्रिमिलेयरची घटनाबाह्य अट त्वरीत रद्द करण्यात यावी व ती रद्द होईपर्यंत क्रिमिलेयरची मर्यादा २० लाख रुपये करण्यात यावी. संविधानाच्या कलम २४३ डी (६) व फलम २४३ टी (६) मध्ये सुधारणा करून देशातील ओबीसी समुदायास लोकसंखेच्या प्रमाणात किंवा २७ टक्के राजकीय आरक्षण लागू करण्यात यावे. केंद्र सरकारच्या सर्व विभागातील ओबीसी संवर्गाचा नोकरीतील २७ टक्के जागा त्वरीत भरण्यात याव्यात. जातनिहाय जनगणना केल्यावरच रोहिणी आयोग लागू करावा, केंद्र सरकारच्या सर्व विभागातील ओबीसी संवर्गातील राखीव २७३ जागा पूर्णतः भरून व्हाईट पेपर जाहीर करावा. ओबीसी शेतकरी, शेतमजुरांना ६० वर्ष वयानंतर पेंशन योजना लागू करण्यात यावी. आदी मागण्या घेऊन आंदोलन करण्यात आले. यावेळी देशभरातील ओबीसी मोठ्या ओबीसींची जातनिहाय जनगणना करा संख्येने उपस्थित होते.