धुळे : ओबीसी अधिकारी कर्मचारी महासंघाची धुळे जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. बैठकीत धुळे जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर चौधरी व जिल्हा महासचिवपदी न्हानू माळी, जिल्हा उपाध्यक्ष खुशाल चित्ते, जिल्हा सचिव मुरलीधर नानकर यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. राज्याचे महासचिव राम वाडीभष्मे यांच्या उपस्थितीत सर्वांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. धुळे येथे बैठकीस ग.स. बँकेचे चेअरमन प्रवीण भदाणे, शिक्षक संघाचे राज्य नेते संजय पोतदार, पुरोगामी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष भूपेश वाघ, विभागीय सचिव रवींद्र देवरे, संदीप मराठे, रवींद्र सैंदाणे, प्रशांत महाले, महानगर प्रमुख ललित वाघ, शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष मिलिंद चौधरी, किशोर माळी, कमलेश चव्हाण, किरण चौधरी, डॉ. भागवत चौधरी आदी सहकारी उपस्थित होते. धुळे जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर चौधरी हे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा नाशिक विभागीय उपाध्यक्ष पदावर देखील असून त्यांच्या या स्तुत्य निवडीबद्दल महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा प्रदेशाध्यक्ष खा. रामदास तडस साहेब, कार्याध्यक्ष अशोक काका व्यवहारे कोषाध्यक्ष गजानन नाना शेलार प्रदेश महासचिव डॉ. भूषण कर्डिले, समन्वयक सुनिल चौधरी, प्रदेश महासचिव युवा आघाडी नरेंद्र चौधरी, जिल्हाध्यक्ष कैलास काळू चौधरी, शशिकांत चौधरी, अनिल अहिरराव, डी.डी. महाले, तुषार दादा चौधरी, रमेश करनकाळ, किशोर थोरात, पप्पूशेठ अहिरराव, हिरु आप्पा चौधरी, महेश चौधरी, विजय नेरकर सर, डॉ. गणेश चौधरी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी हार्दिक अभिनंदन करत भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.