बुलढाणा, दि. २० ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचे येत्या ९ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथे चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने १९ मार्च रोजी चिखली व मेहकर येथे तालुका आढावा बैठक घेण्यात आली. दरम्यान दोन्ही तालुकाध्यक्षांची नियुक्ती करुन नुतन कार्यकारिणी गठीत करण्यात आली.
या संघटनेचे राज्य सल्लागार डॉ. शिवशंकर गोरे व जिल्हाध्यक्ष किशोर पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या दोन्ही बैठका झाल्या. बुलडाणा जिल्हा उपाध्यक्षपदी सुनिल धंदर, चिखली तालुकाध्यक्षपदी राजाभाऊ वायाळ आणि मेहकर तालुकाध्यक्षपदी गणेश पराड यांची नियुक्ती करण्यात आली. येत्या ९ एप्रिलला छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या चिंतन शिबिराचे उद्घाटन प्रा. डॉ. सूरज मंडल दिल्ली यांच्या हस्ते होणार आहे. या चिंतन शिबिरामध्ये दोन्ही तालुक्यातून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. बैठकीला बुलडाणा तालुकाध्यक्ष गजानन पडोळ, मुरलीधर टेकाळे, विठ्ठल इंगळे, प्रविण वायाळ, राम वाघ, संजय घायवट, कैलास डुकरे, गणेश खेडेकर, समाधान बंगाळे, जिवन शेटे, समाधान वाघमारे, सोमकांत साखरे, रामप्रसाद आरमाळ, हषिकेश माळोदे, संदीप पाटील, अनिल सवडतकर, रघुवीर लहाने, कलीम पटेल, समाधान परिहार, गजानन टेकाळे, समाधान गवई, भूषण तुपकर, संदिप रहाटे, रविंद्र जवंजाळ, भूषण लहाने, अमोल मते, किरण खेडेकर, प्रदीप शेळके, विशाल जवंजाळ, सचिन पागोरे, सदाशिव कुलसुंदर, ज्ञानेश्वर शिंगणे, दीपक राजेगावकर यांची उपस्थिती होती.