गडचिरोली - बिहार राज्यात ज्या प्रमाणे ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेण्याचा आला आहे, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही आमचे प्रामाणिक प्रयत्न सुरु आहे अशी घोषणा राज्याचे इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या मुंबई येथील अधिवेशनात केली.
परदेशी शिष्यवृत्तीसाठी बाहेर देशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ५० वरून १०० होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे बिगर व्यावसायिक विद्यार्थ्यांना सुध्दा वसतिगृहात प्रवेश मिळणार, तसेच वसतिगृहात प्रवेशित नसणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजना लागू करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
राज्य सरकारकडे एकूण ३१ मागण्यांचे निवेदन ना. सावे यांना सादर करण्यात आले असून त्याबाबत एकमुखी ठराव पारीत करण्यात आले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या रायपूर येथे झालेल्या अधिवेशनात जातीनिहाय जनगणना व केंद्रात ओबीसी मंत्रालय स्थापन करणे सोबतच इतर ठराव मंजूर करावे लागले. याचे श्रेय राष्ट्रीय ओबीसी महासंघाला जाते असे त्यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष प्रकाश भागरत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी राज्यमंत्री परिणय फुके, माजी मंत्री आ. विजय वडेट्टीवार, आ. किशोर जोरगेवार, माजी आमदार दिगंबर विषे, ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, समन्वयक अशोक जीवतोडे, भालचंद्र ठाकरे, आमदार वझाद मिर्झा, शरद वानखेडे, मुकेश नंदन, प्रा. शेषराव येलेकर, गुनेश्वर आरीकर, अविनाश लाड, सुभाष घाटे, सुरेंद्रकुमार, महिला प्रदेश अध्यक्ष कल्पना मानकर, ऋषभ राऊत, किसन बोंद्रे, चेतन शिंदे, शाम लेडे, प्रकाश साबळे, उमेश पाटील, प्रकाश पवार उपस्थित होते.
राष्ट्रीय ओबीसी मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, विधानपरिषदेचे आमदार सुधाकर अडबाले, अभिजित वंजारी यांचा सत्कार करण्यात आला. अधिवेशनाचे प्रास्ताविक एकनाथ तारमले, संचालन मनोहर मडके, आभार अमर राऊत यांनी मानले.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan