चंद्रपूर : राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने ६ - वा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा परळी वैजनाथ येथे लवकरच होवू घातला असुन या पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय व विशेष कामगिरी केलेल्या प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन राज्य कार्याध्यक्ष तथा जन सन्मानचे मुख्य संपादक प्रा. दशरथ रोडे यांनी प्रसिद्धीपत्रकातून केले आहे.
राज्यातील शैक्षणिक, साहित्यिक आरोग्य सांस्कृतिक, पत्रकारिता, वृत्तपत्र, बातम्या, लेखक, विचारवंत, किर्तनकार, महापुरुषांची ऐतिहासिक जनजागृती या शिवाय अन्य विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्यांनी आपला लेखी स्वरूपात (अर्ज) बायोडाटा दोन छायाचित्रे, १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ च्या (एक वर्षातील )सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, लेखक, लेख, प्रसिद्ध झालेली खालील ( Speed (Post) दोन प्रतिमध्ये स्वतःच्या बायोडाटा सह उल्लेखनीय कामगिरी केलेली माहिती खालील पत्त्यावर पाठवावी. या साठी हा सविस्तर पत्ता खालील प्रमाणे देण्यात आलेला आहे.
प्रा. दशरथ वैजनाथ रोडे संपर्क क्रमांक 9822864203 (राज्य कार्याध्यक्ष तथा मुख्य संपादक जन समान) "श्रावस्ती" प्रियानगर ,/ जिरगेनगर, अंबाजोगाई रोड, सिंचन भवन जवळ, ता. पो. परळी वैजनाथ ( ४३१५१५) जि.बीड महाराष्ट्र राज्य पुरस्कार निवड समितीच्या विविध वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी ज्यांची ज्यांची राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी निवड होईल. त्यांची नावे, मोबाईल, पत्ता फोटो, ६ व्या राज्यस्तरीय निवड समितीचे पत्र, त्यांचा एक व्हाट्सअप गृप तयार करण्यात येईल. तसेच निवड झालेल्या पुरस्कारकर्त्यांना त्यांच्या घरपोच पत्र सुध्दा पाठविण्यात येणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकातून नुकतेच कळविण्यात आले आहे. राज्यस्तरीय पुरस्कार वितरण व निवड या मध्ये कोणत्याही प्रकारची नातेसंबंधात , शिफारस, आढळून आल्यास तो पुरस्कार रद्द करण्याचा अधिकार समितीच्या अध्यक्षांना असेल. राष्ट्रीय अध्यक्ष विजय सूर्यवंशी राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब आढांगळे, राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा दैनिक जय महाभारतचे मुख्य संपादक विजयकुमार वाव्हळ, राष्ट्रीय सचिव प्रवीण परमार , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संतोष जाधव, राज्य सचिव निलेश ठाकरे, डॉ. गोपाळराव लाड, मराठवाडा अध्यक्ष अशोक वायवल प्रकाश कोल्हे, मराठवाडा उपाध्यक्ष सतीश पाटेकर विदर्भ विभाग अध्यक्ष नरेंद्र सोनारकर व अन्य पत्रकार संघाच्या मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य दिव्य पुरोगामी विचारावर संपूर्ण देशामध्ये आणि राज्यांमध्ये पत्रकारांशी अहोरात्र प्रयत्न करणारा संघाचा हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण परळी येथे लवकरच जाहीर होणार आहे. तरी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये काम केलेल्या मान्यवरांनी वरील दिलेल्या पत्त्यावर आपला प्रस्ताव पाठवावे. या पुरस्कारात जीवनगौरव पुरस्कार, जीवन कार्य गौरव पुरस्कार, जीवन युवा पुरस्कार, जीवन समृद्धी पुरस्कार, पत्रकारिता कार्य गौरव पुरस्कार विविध महाराष्ट्रातील महापुरुषांची वैचारिक जनजागृती केलेल्यांचा विशेष कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे राज्य कार्याध्यक्ष प्रा. दशरथ रोडे यांनी कळविले आहे.