वाशीम ता. १८ सत्यपाल महाराजांचा सांस्क्रुतीक वारसा अखंड चालविण्याचा वसा ऊचलल्याची आम्ही ग्वाही पंकजपाल महाराज ह्यांनी वर्हाडी याञोत्सवात दिली. वाशीमचे जिल्हा क्रिडा संकुलातील वर्हाडी याञामध्ये सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराजांचे अनुयायी ह्यांनी आपल्या सप्तखंजेरी वादनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. स्त्री आणि पुरूष ही संसाररथांची दोन चाके आहेत बचत गटांच्या माध्यमामधुन ह्या महीलांचा आपल्या संसारात खारीचा वाटा ऊचलणार्या ह्या ख-या जीजाऊ सावीजींच्या लेकी आहेत असे प्रबोधन करतांना महीला सक्षमीकरण राष्ट्रप्रेम, संपुर्ण स्वच्छता, राष्ट्रीय एकात्मता,व्रुक्ष व जलसंवर्धन, रक्तदान, देहदान,व्यसनमुक्ती,अंधश्रध्दा निर्मुलन आदीसह ज्वलंत विषयावर आपल्या किर्तनामधून समाजप्रबोधन केले जिजाऊ सावीत्री अहिल्याबाई ताराराणी, माता रमाई, शिवराय भिमराय,शाहु महाराज महात्मा फुले अण्णाभाऊ साठे आदी महामानव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबांचे विचारातुन प्रेरणा घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांना साथ संगत निलेश राठोड, नंदू भोयर, पांडुरंग राऊत, खोटे महाराज , विलास भालेराव ह्यांनी दिली