सांगली : जैनांचे तत्त्वज्ञान अहिंसेचे असले तरी चंद्रगुप्त, कुमारपाल, खारवेल, राष्ट्रकूट राजे, शिलाहार राजे यांनी आपल्या पराक्रमाने अनेक युध्दे करून जैन धर्म आणि भारत रक्षणाचे कार्य केले आहे. महाराष्ट्रातील अनेक शिलालेख व हस्तलिखित ग्रंथ याचे पुरावे देत आहेत. जाणीवपूर्वक जैन परंपरेचा इतिहास लपविला जात असल्याचे सांगून नव्या संशोधकांनी खरे वास्तव व परंपरा शोधली पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ इतिहास अभ्यासक संजय सोनवणे यांनी केले.
द. भा. जैन सभेच्या 'प्रगति आणि जिनविजय' या मुखपत्राच्या ११८ व्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन रावसाहेब जि. पाटील होते.
ते म्हणाले, जैन परंपरेचे अनेक संदर्भ महाराष्ट्रात प्राचीन काळापासून विदर्भापासून पश्चिम सापडतात. महाराष्ट्रापर्यंत व दक्षिणेपासून गुजरातपर्यंत जैन परंपरा महाराष्ट्रात विकसित होती.
कालिदासपेक्षाही श्रेष्ठ कवी लेखक जैन परंपरेत होवून गेले. राष्ट्रकूट, शिलाहार, यादव, गंग, चालुक्य, सातवाहन या राजवर्धिनी जैन धर्माला राजाश्रय दिला होता. यातील अनेक राजे जैन होते. ते पराक्रमीही होते, परंतु हा इतिहास लपवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमहामंत्री डॉ. अजित पाटील यांनी स्वागत केले. प्रास्ताविक डॉ. महावीर अक्कोळे यांनी केले. प्रा. डॉ. गोमटेश्वर पाटील यांनी परिचय करून दिला. सूत्रसंचालन सवींद्र पाटील व प्रदीप मगदूम यांनी केले. एन. जे. पाटील यांनी आभार मानले. यावेळी भालचंद्र पाटील, प्राचार्य श्रीधर हेरवाडे, डॉ. सी. एन. चौगुले, प्रा. राहुल चौगुले, नीलम माणगावे उपस्थित होते.
Satyashodhak, obc, Bahujan