जत: दि.४ एप्रिल २०२३ - राष्ट्रीय पिछडा(ओ.बी.सी.) वर्ग मोर्चा महाराष्ट्र राज्यव्यापी परिवर्तन यात्रा मंगळवार दिनांक ११ एप्रिल २०२३ रोजी चौंडेश्वरी हॉल पलूस येथे सकाळी १०.०० ते २.०० वाजेपर्यंत तसेच बुधवार दिनांक १२ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १०.०० ते २.०० वाजेपर्यंत बालगंधर्व नाट्यगृह विजयपूर रोड,मिरज तर सांयकाळी ६.०० ते १०.०० वाजेपर्यंत आहिल्यामाई होळकर स्मारक, विजयनगर सांगली येथे आयोजित केलीअसून राष्ट्रीय पिछडा ओबीसी वर्ग मोर्चा देशामध्ये ओबीसी वर्गासाठी संवैधानिक हक्क अधिकारासाठी संघर्ष करीत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षें पूर्ण झाली तरी ओबीसी वर्गाचे समस्याचे निराकरण होऊन न्याय मिळाला नाही म्हणून ओबीसी वर्गात जागृती निर्माण होऊन मजबूत संघटन निर्माण होण्यासाठी परिवर्तन यात्रा आयोजित केली असून या यात्रेत तन,मन,धनाने सर्वानी सामील होऊन सहकार्य करावे. यासाठी जत तालुका ओबीसी कार्यालयात नियोजन बैठक संपन्न होऊन परिवर्तन यात्रेचे नियोजन करण्यात आले.
ओबीसी परिवर्तन यात्रेतील महत्वाचे मुद्दे
१) जाती आधारित जनगणना करण्यासाठी
२) किमान आधारभूत किंमत शेती मालाला देण्यासाठी
३) मंडल आयोगाच्या सर्व शिफारशी अमलात आणण्यासाठी
४)ओबीसी वर्गाना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळण्यासाठी
५) सरकारचे खाजगीकरण धोरण बंद करणेसाठी.
६)ओबीसीं महापुरुषांचे गौरवशाली इतिहास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी
७) केंद्र आणि राज्य सरकारने आपल्या अर्थसंकल्पात ओबीसींचे कल्यासाठी पुरेशी तरतूद करण्यासाठी.
८) लिंगायत धर्माला स्वतंत्र संवैधानिक मान्यता देण्यासाठी.
वरील सर्व मुद्दे साठी संघर्ष करण्यासाठी
सर्व ओबीसी बांधवांनी परिवर्तन यात्रेचे ठिकाणी वेळेवर उपस्थित रहावे.
या बैठकीत तुकाराम माळी, इंजिनिअर बी.एम्.शिंदे साहेब, मुबारक नदाफ,रविंद्र सोलनकर,चंद्रकांत बंडगर, आनंदराव पांढरे,दिनकर पतंगे, नामदेव बेळ्ळे,अर्जुन कुकडे, आशाराम चौगुले, भारत माळी,शंकर केसरखाने,सुमंत भाले,राहूल मोरे,देवेंद्र शिंदे, अंगडी,शिवकुमार तंगडी,आण्णासाहेब टेंगले, आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan