नागपूर, प्रति : भारतीय संविधानामुळेच भारत देश मजबूत झालेला आहे. धर्माच्या नावावर निर्माण झालेले देश नेस्तनाभूत झालेत परंतु संविधानाने या अनेक धर्माच्या व जातीच्या देशाला मात्र एकत्र बांधून ठेवलेले आहे. ही संविधानाची फार मोठे देण आहे. असे अध्यक्षस्थानावरून प्रदीप ढोबळे यांनी सांगितले. दिघोरी येथे ओबीसी सेवा संघाचे जिल्हा अधिवेशन नुकतेच पार पडले. त्यावेळेला अध्यक्षस्थानी प्रदीप ढोबळे तर प्रमुख मार्गदर्शक प्रा. माधुरी गायधनी दुपटे व मुख्य अतिथी स्थानी डॉ. रमेश राठोड होते. तर प्रमुख मार्गदर्शक प्रा. माधुरी गायधनी म्हणाल्या, 'ओबीसी महिलांनी सत्यशोधक बनावे या देशाला सद्यशोधक बनविण्याचे कार्य सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले ओबीसी महिलांनी राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांचा आदर्श घेऊन आपली आपली सदसद विवेक बुद्धी जागृत करावी जेणेकरून कोणीही आपल्याला कुठल्याही चुकीच्या मार्गाकडे नेणार नाही. या सर्व कर्मकांडातून मुक्त करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाज संस्थेची स्थापना करून आपल्याला जागृत करण्याचे कार्य केलेले आहे. हा आदर्श आपण सतत जपावा. डॉ. रमेश राठोड यांनी 'ओबीसी समाजाने बुद्धाच्या धम्माकडे वळावे कारण बुद्धाचा धम्म आपल्याला विवेकशीलता आणि वैज्ञानिक दृष्टी देतो आणि तोच आपल्या प्रगतीचा खरा मार्ग आहे' असे सांगितले. या प्रसंगी 'समाजरत्न' सन्मान देऊन 'शिल्पा खंडाईत व संजीव बोरकर सरचिटणीस ओबीसी सेवा संघ भंडारा' यांचा सत्कार करण्यात आला. तसेच दिघोरी येथील सर्वसाधारण कुटुंबातील वैभव तुळशीदास चकोले यांनी आय आय टी खडकपूर येथे प्रवेश मिळविल्या बद्दल संविधान ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले.
तत्पूर्वी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पवार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. स्वागताध्यक्षा दिघोरीच्या सरपंच सुनिता साळवे यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले. संचालन दीपक कांबळे व गोपाल देशमुख, आभारप्रदर्शन मिलिंद करंजेकर यांनी केले.