गोरेगाव येथे ओबीसी सेवा संघाचे तिसरे अधिवेशन

    गोरेगाव, ता. १३ : ओबीसी सेवा संघाचे तिसरे अधिवेशन रविवारी (ता. १२) येथील गुरूकृपा लॉन येथे आयोजित करण्यात आले होते. अधिवेशनाचे उद्घाटन धनजंय वंजारी यांनी केले. अध्यक्षस्थानी प्रदीप ढोबळे होते. यावेळी जे. के. लोखंडे, बी. एम. करमकर, उपेंद्र कटरे, सावन कटरे, उमेश कोराम, डॉ. गुरुदास येडेवार, सविता वेदरकर, बबलू कटरे, संयोजक खेमेंद्र कटरे, मनोज मॅढे, संदीप तिडके, पुष्पा खोटेले, उमेश रहांगडाले, योगेश पारधी उपस्थित होते.

3rd Convention of OBC Seva Sangh at Goregaon     यावेळी मार्गदर्शन करताना धनंजय वंजारी म्हणाले की, कुप्रथा व परंपरांना तोडून आता ओबीसी समाज संविधानिक लढाईकरिता एकत्र येऊ लागला हे या अधिवेशनाच्या ओबीसींच्या उपस्थितीवरून स्पष्ट झाले आहे. ज्या संस्था आपल्याकरिता निर्णय घेतात त्या संस्थांमध्ये आपला किती वाटा आहे, यावरून आपला राजकीय विस्तार अवलंबून आहे. हिंदू राष्ट्र व संविधानिक राष्ट्रातील फरक समजून घेताना हिंदू राष्ट्राची मागणी करणारे कोण व त्यांची जननी कोण हे बघितल्यास जे संघटन शासकीय जमात राहिलेल्या संघटनांच्या विविध शाखातून केले जात आहे. दरम्यान, दुसऱ्या सत्रात मंडल आयोग, नचीअप्पन आयोग, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी, क्रिमीलिअरची अट, महाज्योती संस्था व राज्यकर्त्यांची भूमिका या विषयावर चर्चा करण्यात आली. प्रास्तविक ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष बी. एम. करमरकर यांनी केले. स्वागताध्यक्ष आर. आर. अगडे म्हणाले की, आमच्या जिवनावर ज्या महामानवांचा प्रभाव पडला त्यांचे विचार समाजापर्यंत पोचविण्याकरिता हे ओबीसींचे अधिवेशन आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून समाजाला संघटित करून लढा सुरू केला आहे. गाव तिथे ओबीसींची शाखा हे अभियान राबवण्यास सुरवात केल्याचे सांगितले. अधिवेशनाच्या पूर्वी ५० गावांमध्ये जाऊन अधिवेशनाची माहिती नागरिकांना देण्यात आली.

    प्रदीप ढोबळे म्हणाले की, भारताचे संविधान धर्मनिरपेक्ष असून हिंदू राष्ट्राची मागणी करणेच गैरसंविधानिक आहे. पोटातलं हिंदू राष्ट्र वेगळे असून, भारताच्या लोकशाहीमुळे ते ओठावर आणता येत नाही. हे वास्तविक आहे. पाच हजार वर्षांपूर्वी भारतात आयांचे आगमन नव्हे तर इंग्रज मोघलांसारखे आक्रमणच होते. हे सत्य इतिहासातून लपविण्यात आले १९४७ ला मिळालेले स्वातंत्र्य हे राजकीय स्वातंत्र्य होते, सामाजिक नव्हे. संविधानिक लढाई लढायला पाहिजे. बाबासाहेबांनी संविधानात आपल्याला अधकार दिले. त्यामुळे आपणास आज शिक्षणासह नोकरीत प्रतिनिधीत्व मिळाले. हिंदू राष्ट्र संकल्पनेमुळे नाही वास्तव्य स्वीकारावे लागेल. मंडल आयोगामळे ओबीसींना आरक्षण मिळाले पण मंडल आयोगाच्या विरोधात कोणत्या विचाराचे लोक त्यावेळी व आजही आहेत. याचा विचार करावा लागेल असेही ते म्हणाले. अधिवेशन संयोजक हरिराम येळणे होते. संचालन भूमेश ठाकरे यांनी केले. आभार कार्याध्यक्ष रामेश्वर बागडे यांनी मानले.

Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209