जिल्हा चंद्रपूर पं.स.वरोरा अंतर्गत जि.प.उ.प्राथ.शाळा वाघनख येथे मुख्याध्यापक रामचंद्र सालेकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ,अहिल्याबाई होळकर,क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले,त्यागमुर्ती रमाईंच्या प्रतिमांचे पुजन करुन महिला दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या दिनाचे औचित्ये साधून पोटच्या मुलाला बाप मिळवून देण्याचा संघर्ष करता करता बापाने पाठ फिरवली तेव्हा स्वतःच नाव द्यायसाठी गावात दुसऱ्याची स्वयंपाक धुनीभांडी करुन बापाऐवजी स्वतः आईच नाव मिळावं यासाठी न्यायालयीन संघर्ष करत अखेर आपल्या मुलाला खुशाल कमल कातोरे असं नाव मिळविलं. एवढ्यावरच न थांबता अशिक्षित असलेल्या या कुमारी मातेने अठराविश्व दारिद्रयाशी संघर्ष करत आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी कसलीही कसर सोडली नाही. या मातेचा संघर्ष पदोपदी पिच्छा सोडत नव्हता,मुलागा बारावीला असतांना बापाच नावच नसल्याने बापाचं रेकार्ड नसल्याने जात वैधता प्रमाणपत्र समितीने जात प्रमाणपत्र वैधता नाकारली. पुढे मुलाचे शिक्षण कसे होईल या विवंचेने जात वैधता प्रमाणपत्रासाठी या मातेचा संघर्ष सुरु झाला, जात वैधता प्रमाणपत्र समितीने या महिलेच्या घरी व शाळेला भेट देवून परिस्थिती जाणून घेतली व अखेर त्या मुलाला जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्याच्या संघर्षात यश मिळाले. मुलगा बारावी झाला. जीवाच रान करुन या महिलेने मुलाच बी.ई. शिक्षण पुर्ण करुन इंजिनीअर केलं. ती माय एवढ्यावरचं थांबली नाही तर आपल्या मुलाला कलेक्टर करणार या जिद्दीनं मुलाला दिल्लीला पाठविले. दिल्ली येथे मुलाचे युपीएससी चे क्लासेस सुरु आहे. मुलाला कलेक्टर बणवणार हे स्वप्न पुर्ण कराण्यासाठी धेय्यवेडी झालेल्या या मातेचा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वाघनख येथे जागतिक महिला दिनी शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र सालेकर यांचे हस्ते गौरव करुन या मातृशक्तीचा सन्मान करण्यात आला. विज्ञान शिक्षक धनराज रेवतकर यांनी जागतीक महिलादिनाचे महत्व व महिला उन्नतीसाठी कार्य कराणाऱ्या महापुरुषांचे योगदान आपल्या प्रास्ताविकेतून विषद केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र सालेकर यांनी या मातृशक्तीचा सन्मान करतांना सांगितले की कमलबाई कातोरे ह्या खऱ्या अर्थाने रणरागीनी आहेत. त्यांच्या या संघर्षाला जगात तोड नाही. जगात कुणाच्या वाट्याला आला नसेल असा संघर्ष या महिलेनं केला. भारताच्या इतिहासामध्ये एकमेव उदाहरण असेल की आईच्या नावाने मुलाच नाव चालत असलेलं. आपल्या प्राचीन मातृसत्ताक सिंधु संस्कृतीचं आधुनिक उदाहरण म्हणजे कमलबाई आहे. खरं तर आई हिच विश्वाची जननी आहे.जन्म देणाऱ्या बाळाच सर्वस्व आई हिच असते. आईचेच नाव बाळाला मिळायला हवे, परंतु पितृसत्ताक पुरुषप्रधान या संस्कती मध्ये हा जन्मदात्या मातेवर अन्याय आहे. या अन्यायावर परिस्थितीने का होई ना कमलबाईने वाचा फोडली. या कठीण संघर्षात त्या यशस्वीही झाल्या. याचा फायदा तमाम भारतीय महिलांनी घेवून आपलं नाव आपल्या मुलांना द्यावं यासाठी पुढे यावं. आज मराठा सेवा संघाच्या विचारधारेत आलेले सर्व आपल्या मातेच नाव स्वतःच्या नावाला जोडून मातेचा सन्मान करत असल्याचे सांगीतले. आम्ही शिक्षकांनी तिच्या मुलाला लॕपटाॕप साठी छोटीशी मदत केल्याच समाधान वाटत असल्याच मुख्याध्यापक रामचंद्र सालेकर यांनी सांगीतलं.
याप्रसंगी स.शिक्षक सौ.रेखा थुटे,संतोष धोटे, तसेच योगा टिचर निमजे मॕडम यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन इयत्ता सातवीची विद्यार्थीनी कु.श्रावणी रामटेके हिने तर आभार कु.पलक दादाजी चौधरी हिने केले. खाऊ वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan