ओबीसी सेवा संघाची मासीक मिटिंग रविवार दिनांक 05-03-2023 रोजी सकाळी 11.55 वाजता, कोल्हापूर महापालिकेच्या मागे श्री नामदेव शिंपी समाजाचे कार्यालयात छ.शिवाजी महाराज, छ.शाहू महाराज, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर,महाज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, संत नामदेव महाराज यांच्या फोटो पूजनाने करण्यात आली. सभेत खालील विषयांवर चर्चा करण्यात आली.
ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष श्री चंद्रकांत का॑डेकरी यांनी थोडक्यात ओबीसी सेवा संघाचा आढावा घेऊन उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार मानले. ओबीसी समाजाला आरक्षण देण्यासाठी, जनगणना झालीच पाहिजे म्हणून आग्रह धरण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे आणि संघटित पणे लढा दिला पाहिजे व त्यासाठी ज्या ज्या ठिकाणी निवेदन देणे गरजेचे आहे त्या त्या ठिकाणी निवेदन देऊ व हा लढा तीव्र करू असे ठामपणे सांगून सर्वांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
श्री कृष्णा हरिबा लोहार दानोळीकर, (कार्याध्यक्ष) यांनी ओबीसी समाजाला मिळणाऱ्या कर्जास॑ब॑धी सविस्तर माहिती दिली आणि शासकीय अनुदान असणारे कर्ज मिळवून देण्यासाठी लागणार्या कागदपत्रांची माहिती दिली आणि काही अडचणी आल्यास संपर्क साधावा असे आवाहन केले, श्री बळवंत सुतार, (केंद्रिय सदस्य) यांनी ओबीसी समाजाला बिहार राज्याला जसे आरक्षण मिळाले त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री, पालक मंत्री, ग्राम विकास मंत्री, भागातील खासदार, आमदार यांना निवेदन देण्यात येईल असे आग्रहाने सांगितले.
आजच्या मीटिंगसाठी उपाध्यक्ष श्री आकाराम कुंभार, श्री विनायक मुळे ,श्री सुभाष कोळेकर, श्री संजय परीट, सौ भारतीय आडुरकर, सचिव श्री अशोक सातुसे सहसचिव डॉक्टर अमोल बावडेकर, संपर्कप्रमुख श्री महादेव कुंभार, श्री महादेव सुतार, श्री ओंकार पतंगे, श्री राजाराम रसाळ, श्री अनिल परीट, श्री सर्जेराव सुतार, महिला प्रतिनिधी सौ उर्मिला सुतार,सौ शोभा संकपाळ, सौ कविता सुतार, सौ रुपाली बावडेकर, कोषाध्यक्ष श्री गणपती सुतार, संचालक श्री चंद्रकांत जंगम, श्री जितेंद्र लोहार, श्री विश्वनाथ सुतार, श्री वासुदेव / बाळासो अनंत वर्णे, श्री हणमंत सुतार, श्री धनाजी लोहार ,श्री अनिल कुंभार, श्री राजेश गणबावले, श्री अनिल राजमाने, श्री दिनकर सुतार, श्री बळीराम गुरव, श्री सचिन सुतार श्री अनिल म्हेत्रे, व उपस्थित ओबीसी बांधव यामध्ये श्री नरेंद्र मायनेकर, श्री अमित मायनेकर, श्री दीनानाथ सुतार, श्री सर्जेराव सुतार, श्री किशोर भाट, श्री प्रकाश कुंभार, श्री शिवाजी कुंभार, श्री शिवानंद नाईक, श्री नरेंद्र आडुरकर, श्री ओमप्रकाश सुतार, श्री सर्जेराव लोहार, श्री विनायक सुतार, श्री नामदेव कुंभार, श्री बाबुराव लोहार, सौ कोयनाबाई कुंभार, श्री शांताराम सुतार, श्री संतोष गुरव, कु.आकाश लोहार ,श्री सुरेश सुतार उपस्थित होते आभार श्री. परीटसो यांनी मांडले व सभा अत्यंत खेळीमेळीत पार पडली.