एकच मिशन - जुनी पेन्शन. एकच नारा ओबीसींची जात निहाय जनगणना करा. या व इतर मागण्यांकरिता भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटन दिल्लीच्या वतीने महाराष्ट्र राज्य अधिवेशन ११ व १२ मार्च २०२३ संभाजीनगर (औरगांबाद) येथील हॉटेल आदर्श येथे आयोजित करण्यात आले आहे.
सदर अधिवेशनाला उद्घाटक म्हणून खासदार इम्तियाज जलील (संभाजीनगर) उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, स्वागताध्यक्ष डॉ उच्चलाताई दहिफळे, प्रमुख पाहुणे राष्ट्रीय अध्यक्ष एस. जी. म चिनवार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ज्ञानेश्वर गोरे, प्रकाश अण्णा शेंडगे, शांताराम बापू गाडेकर, भास्करराव आंबेकर, 73 गणपती मंडल, बिहार, एड मंगेश ससाने, गजानन सानप यासह इतर अनेक, विचारवंत, अभ्यासक, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. सदर अधिवेशनामध्ये ओबीसींच्या विविध विषयांवर ? अनेक परिसंवादाच्या माध्यमातून विचारमंथन होणार आहे.
अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रांत ओबीसींसह सर्व जातींच्या जनगणनेची आवश्यकता या विषयावरील चर्चासत्राच्या अध्यक्ष सुशीलाताई मोराळे राहणार आहेत. तर एड. बालाजी सागर किल्लारीकर, रमेश पिसे मार्गदर्शन करणार आहेत. तिसऱ्या सत्रात मंडल पूर्व व मंडल पश्चात ओबीसी व भटके विमुक्त जाती जमातींची दशा व दिशा या विषयावर सुनिता काळे, सत्यशोधक प्रा. डॉ. भालिदास साहित्यिक अभ्यासक भांगे, प्रसिध्द डॉ. शिवाजी हुसे, चौथ्या सत्रात संघटनात्मक बांधणी विस्तार व नेतृत्व विषयावर एस. जी. माचनवार, सत्यशोधक प्रबोधनकार अरविंद माळी, विलास काळे मार्गदर्शन करणार आहेत. अधिवेशनाच्या दुसन्या दिवशी १२ मार्च रोजी सकाळी पाचव्या सत्रात -सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सव वर्ष आणि सत्यशोधक संस्कृतीची प्रासंगीकता एक चिंतन या विषयवार सत्यशोधक विचारवंत प्रा सुदाम चिंचाणे, बालाजी थेटे, मायाताई गोरे, प्रा. डॉ नवनाथ गोरे तर सहाव्या सत्रात नवीन शैक्षणिक धोरण २०२० हित कुणाचे ? या विषयावर शिक्षणविषयाचे अभ्यासक प्रा. डॉ. प्रभाकर गायकवाड, शिक्षणतज्ज्ञ रमेश बीजेकर व सविताताई हजारे विचार मांडणार आहेत. सदर अधिवेशन यशस्वी करण्याकरिता ओबीसी, व्हीजेएनटी समाजबंधू भगिणींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे सुदाम चिंचाणे, डॉ कालिदास भांगे, डॉ वसंत हारकळ, डॉ प्रभाकर गायकवाड, डॉ देवराज दराडे, जगन अंभोरे आंदींनी केले आहे.