चिंचवड कसबा पोटनिवडणुकीचा अन्वयार्थ.

प्रदीप ढोबळे,  BE MBA BA LLB, अध्यक्ष ओबीसी सेवा संघ- 9820350758

     महाराष्ट्रात काही दिवसाआधी पाच विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या. या पाच जागे पैकी तीन जागा मविआ( महाराष्ट्र विकास आघाडी)  व एक जागा भाजपाला मिळाली.. एका ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून आला. *विशेष म्हणजे विदर्भात फाडनवीस गडकरी सारखे उत्तुंग नेतृत्व भाजपाकडे आहे त्या  विदर्भातील दोनही जागा मविआस  मिळाल्या.नागपूरची निवडणूक शिक्षक मतदार संघाची होती. येथे तिरंगी निवडणूकचे चित्र असतानाही मविआ उमेदवारांनी भाजपाच्या उमेदवाराला दुप्पट च्या मताने पाडले.  अमरावती निवडणुकीत पदवीधरांना मतदान करायचे होते; पदवीधरांनी सुद्धा भाजपाच्या विरुद्ध ही जागा महाविकास आघाडीला दिली.
 
     शिक्षक झाले; पदवीधर झाले आणि आता सामान्य जनता. भाजपाच्या दोन आमदारांच्या मृत्यूमुळे रिक्त झालेल्या जागांची पोटनिवडणूक नुकतीच झाली. दोन्ही जागा पुणे विभागातल्या कसबा आणि चिंचवड. संपूर्ण महाराष्ट्राच लक्ष या निवडणुकीवर लागले होते. लक्ष यासाठी सुद्धा होते की या दोन निवडणुका 2024 ला होणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीची मार्ग निर्माण करणाऱ्या होत्या.

Prakash Ambedkar and Ravindra Dhangekar    कसब्याला मृत पावलेल्या आमदार मुक्ता टिळक. कसबा हा ब्राह्मण बहूल विभाग. 28 वर्षापासून भाजपाचा आमदार येथून सातत्याने निवडून येत होता. पुणे खासदार बापट आधी याच मतदारसंघातून निवडून आलेले. भाजपाने निवडणुकीत ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद टाळण्यासाठी मराठा समाजातील व्यक्तीला उमेदवारी दिली. कुठल्याही परिस्थितीत निवडणूक जिंकण्यासाठी सर्व काही सोडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोन-तीन दिवस  प्रचारात होते. रोड शो करत होते. ब्राह्मणांना तिकीट न दिल्यामुळे हिंदू महासभेचे अध्यक्ष दवे यांनी रागातून उमेदवारी जाहीर केली. ब्राह्मणांची मतं कमीत कमी आपल्याला मिळतील असे त्यांना वाटले होते व त्यामुळे ही निवडणूक तिरंगी होईल असा त्यांचा कयास होता. निवडणूक दुरंगी झाली आणि दवे यांना मात्र काही शेकडा मते मिळाली. काँग्रेसचा उमेदवार दहा हजार पेक्षा जास्त मतांनी निवडून आले. भाजपाचा बालेकिल्ला ढासळला.

    इकडे चिंचवड मध्ये मविआतील  पक्ष राष्टवादी व शिवसेनेमध्ये उमेदवारीसाठी वाद होता. येथील उमेदवारी शिवसेनेस  दिल्यास बहुजन वंचित आघाडी समर्थन देईल असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. कारण वंचित आघाडीने  उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने सोबत युती केली आहे. परंतु उमेदवारी राष्ट्रवादीला मिळाली. कलाटे च्या रूपाने येथे तिसरा उमेदवार उभा झाला. बहुजन वंचित आघाडी ने या उमेदवाराला पाठिंबा दिला. येथे या तिसऱ्या उमेदवाराने चाळीस हजार मते घेऊन मविआ चा उमेदवार काटे यांना पाडले आणि इथे भाजपाच्या जगताप मॅडम निवडून आल्या.

    कसब्यातून निवडून आलेला उमेदवार धंगेकर हा धन्यवाद देण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांना भेटला. थोडक्यात कसब्यात वंचितने  उमेदवार दिला नाही म्हणून हा  उमेदवार निवडून आला ही कबुली त्याने या अर्थी दिली आणि चिंचवड मध्ये वंचित नी  उमेदवार दिला तर मविआ चा उमेदवार पडला. अर्थातच चिंचवड मध्ये जर वंचित नी उमेदवार दिला नसता तर या दोन्ही ठिकाणी भाजपा पराभूत झाली असती.

     2019 ला निवडून आलेल्या जागा भाजपा आता टिकवू शकत नाही असे चित्र महाराष्ट्रात निर्माण झाले असते. काँग्रेसच्या नाना पटोले  यांनी कसब्यात काँग्रेस निवडून आल्यावर विधानसभेत भाजपाची उलटी गिनती सुरू झाली आहे असे म्हटले; परंतु काहीच वेळात चिंचवडची जागा  भाजपाकडे गेली.

    यातून हे स्पष्ट होते की भाजपाच्या विरुद्ध दुरंगी लढत झाली तर भाजपा महाराष्ट्रातून समूळ नष्ट होईल; परंतु जर निवडणुका तिरंगी झाल्या तर भाजपाचे जिंकून येण्याचे प्रमाण वाढते. तसे बघितल्यास वंचित बहुजन आघाडीची भूमिका भाजपाच्या विचारधारेच्या विरुद्ध अगदी टोकाची आहे; परंतु जर महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला सन्मानाने स्वतः सामील करून घेत नसेल तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात हेही या निवडणुकीने दाखवून दिलेले आहे.* वंचित बहुजन आघाडी  सामाजिक मागासलेल्या वर्गाचे प्रतिनिधित्व करते. भाजपा असे की मविआ यांनी कधीच मागासलेल्या जातींना सन्मानपूर्व योग्य वाटा दिलेला नाही. *महाराष्ट्राचे राजकारण हे सातत्याने ब्राह्मण मराठा डॉमिनेटेडच राहीले आहे… यात वंचितांना योग्य स्थान मिळणार का ? हे प्रश्नचिन्ह या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात उभे झाले आहे.

जय भारत जय संविधान

प्रदीप ढोबळे, BE MBA BA LLB, अध्यक्ष ओबीसी सेवा संघ- 9820350758

Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209