शेगाव - शिक्षणात सुधारणा नाही वंचिताना शिक्षण नाही अशात साखर शाळाची गरज काय आमच्या मुलांनी उसतोडणी करुच नये यासाटी काम व्हायला हवे. केवळ ओबीसींचीच नव्हे तर सर्वच धर्म जातींतील सर्वाची सम्रग जनगणना करण्यात यावी. जातगणनेशिवाय आमचा विकास शक्य नाही हे सर्वच राजकीय नेते कार्यकर्त्यांनी पक्षभेद विसरून स्विकारायला पाहिजे. प्रस्थापित सनातनी लोकांनी आपल्या ८० टक्के बहुजन समाजाला गुलाम केले आहे. त्यां सनातनी विचारधारेच्या विरोधात लढाईची ही वेळ आहे. म्हनून जनगणना होण आवश्यक आहे... प्रस्थापित विरुध्द विस्थापीत असा लढा आपला आहे असे विचार गौरसेनेचे राष्ट्रिय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण यांनी व्यक्त केले.
ओबीसी-व्हीजेएनटी-एसबीसी समन्वय समिति द्वारा ६ नोव्हेंबर रोजी आदर्श मंगल कार्यालय, आनंद विहार येथे आयोजित ओबीसी चर्चासत्र व सम्मेलनात बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन उपाध्यक्ष ओबीसी जनमोर्चाचे प्रा. रमेश पिसे यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय गोरसेना अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण होते. विचारमंचावर संघर्ष वाहिनीचे दीनानाथ वाघमारे, ओबीसी अधिकार मंचचे खेमेन्द्र कटरे, ओबीसी जनमोर्चा उपाध्यक्ष विलास काळे,ओबीसी सेवा संघाचे गोपाल सेलोकर, मोहेंदपूर येथील भाऊलाल बाबर, दत्तात्रय ठाकरे खामगाव, ओबीसी संघर्ष कृती समितीचे कैलास भेलावे, प्रा. अनिल डहाके, प्रा.उमेश बुलढाणा येथील अतुल भुसारी , खामगावचे सुधीर सुर्वे, डॉ. प्रमोद पाचुर्डे अमरावती, अमोल अकोला, श्रीमती सुनिता काळे हे कंकड उपस्थितीत होते. यावेळी प्रा. उमेश सिंगनजुडे, भाऊलाल बाबर, माधव बांगरे,गोपाल सेलोकर, सुनिता काळे यांनीही विचार व्यक्त केले.
ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावे.१००टक्के शिष्यवृती सर्वच अभ्यासक्रमात मिळायला हवे. वसतीगृह सुरू त्वरीत सुरू करण्यात यावे. आर्थिक विकास महामंडळावर चांगले संचालक नेमण्यात यावे. महाज्योती संस्थेला लोकाभिमुख करण्यात यावे. ओबीसी समाजाचा जनगणने शिवाय सामाजिक आर्थिक विकास शक्य नाही या विषयावर तसेच - ओबीसी महामंडळ महाजोती ओबीसी वस्तीगृह शिष्यवृत्ती विषयावर चर्चा करण्यात आली. विदर्भातील सर्व ओबीसी व्हीजेएनटी एसबीसी कार्यकर्त्य सहभागी झाले होते. संचालन गोपाल देशमुख यांनी केले तर आभार खेमेंद्र कटरे यांनी मानले.