नागपूर : माजी खासदार पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त संविधान परिवारतर्फे दीक्षाभूमी येथील पुतळ्यासमोर आदरांजली वाहण्यात आली. यावेळी संविधान परिवारचे मुख्य संयोजक प्रा. राहुल मून, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रा. रमेश पिसे, कामगार नेते चंद्रहास सुटे यांनी दादासाहेबांच्या जीवनकार्याबाबत माहिती दिली. त्यानंतर गायकवाड यांना मौन आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचे संजय रामटेके, काँग्रेसचे भाऊराव कोकणे, नरेश खडसे, प्रेमकुमार म्हैसकर, जितेंद्र जीभे, विनोद मेश्राम, राजु चव्हाण, संजय ठवरे, रोशन मून, पुरुषोत्तम कामडी, दामू मून, सुरेश तामगाडगे, मुकुंदा दुधमोगरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan