नागपूर : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी संविधान परिवारच्यावतीने कॉटन मार्केट येथील महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याजवळ अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संविधान परिवारचे संयोजक प्रा. राहुल मून, प्रा. रमेश पिसे, कामगार नेते चंद्राहास सुटे, माजी न्यायमूर्ती नरेश बनसोड, भाऊराव कोकणे, भूषण दवंडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. देशात मुलींसाठीची पहिली शाळा सुरू करण्यासह बहुजनांसाठी शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या, समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी स्वतःला घेणाऱ्या महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना 'भारतरत्न' प्रदान करावा, पुण्यातील भिडेवाडा हे राष्ट्रीय स्मारक निर्माण करावे, महात्मा जोतिबा फुले यांनी निर्माण केलेल्या शाळांची दुर्दशा झाली असून या सर्व शाळांची पुनर्बांधनी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. अभिवादन कार्यकमाला सुरेश तामगाडगे, राजू चव्हाण, प्रमोद मून, विकास पाटील, प्रशांत ढाकणे, विनोद मेश्राम, जितेंद्र जिभे, नरेश खडसे, प्रदीप नारायणे, राजू चव्हाण, संजय ठवरे, सुनील ईलमकर, दामू मून, विकास पाटील, प्रा. मनीष वानखेडे, राजेश कांबळे, विनोद तायवाडे, पुष्पोत्सम कामडी, काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे दिनेश वाघमारे, मुकुंद दुधमोगरे, शेखर राऊत, दिनेश नागदिवे, सेवक मून, मृणाल बागडे, बबलू कळंबे, नरेश गायकवाड, चंद्रमणी उके, संजय अंभोरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.