चंद्रपूर - नोव्हेंबर २००५ पासून नियुक्त झालेल्या शिक्षकासह अन्य सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्त पेन्शन योजना बंद करण्यात आली आहे. मात्र सुरक्षित भविष्यासाठी जुन्या पेन्शन योजनेसह, उपदान आणि कुटुंब निवृत्ती वेतन मिळविण्यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने भव्य जुनी पेन्शन संकल्प यात्रा दि. २६ डिसेंबर २०२२ पासून सुरु होणार आहे. या न्याय हक्काच्या मागणी साठी राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने या होणाऱ्या जुनी पेन्शन संकल्प यात्रेला आपला पाठींबा जाहीर केला आहे.
पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा मूलभूत हक्क असून या प्रश्नाकडे शासन व लोकप्रतिनिधी डोळेझाक करीत आहे. तरी शासन, लोकप्रतिनिधीचे लक्ष वेधण्यासाठी ही जुनी पेन्शन संकल्प यात्रा दि. २५ डिसेंबर ते २७ डिसेंबर २०२२ या कालावधीत नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात भव्य दिव्य पेन्शन यात्रा आयोजित केली आहे. ज्या बांधवांना पेन्शन नाकारली जात आहे अशा शिक्षकासह, सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांनी व आपलेच कर्मचारी बांधव समजून इतरही कर्मचाऱ्यांनी मोठया संख्येनी सहभागी होण्याचे राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी महासंघाचे वतीने आव्हान श्याम लेडे, अनिल नाचपल्ले, मनोज गौरकर, अशोक टिपले, रामराव हरडे, संजय मांगे यांनी केले आहे.