औरंगाबाद: फुले-आंबेडकरांच्या विचारांबरोबरच हे शतक ओबीसीचे असेल, असे भाकीत प्रख्यात साहित्यिक व विचारवंत प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी शनिवारी केले.
महाराष्ट्र राज्य ओबीसी जनजागरण व संघर्ष समिती, नॉन पॉलिटीकल ओबीसी, एससी, एसटी सोशल फ्रंट व बहुजन सामाजिक सांस्कृतिक मंचतर्फे माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्या स्मृतीदिनानिमित्त सिडको कॅनॉट गार्डन येथे आयोजित अभिवादन सभेच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
रतनकुमार पंडागळे, महेश निनाळे, डॉ. रमेश धनेगावकर, सरस्वती हरकळ, अंबादास रगडे, अशोक पगार, कचरु वेळंजकर, कय्युम नदवी, दर्शनसिंग मलके, के. ई. हरिदास आदींनी यावेळी मनोगते मांडली. विविध ठराव यावेळी संमत करण्यात आले. मंडल आयोग लागू करून तमाम ओबीसींना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम व्ही. पी. सिंग यांनी केलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार देऊन तसेच डॉ. बाबासाहेबांचे नातू अॅड. बाळासाहेब आंबेडकरांना राज्यसभा सदस्यपदी नियुक्त करून व्ही. पी. सिंगांनी विचारांची दिशा दाखवून दिली, याकडे महेश निनाळे यांनी लक्ष वेधले.
कांचन सदाशिवे, जया गजभिये, विष्णु वखरे, सुरेश आगलावे, दुर्गादास गुढे, किशन पवार, कैलास घोडके, विलास चंदने, अॅड. नरहरी कांबळे आदींची उपस्थिती होती.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan