संविधान हे सर्व श्रेष्ठ विद्वान महापुरुषाने लिहले

     भारतीय समाजामध्ये अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणाऱ्या लोकांची संख्या कमी नाही. तर्क, बुद्धी चा अभ्यास करता फक्त गोंधळ करण्यात अग्रेसर भारतीय लोक आहेत. आपले वर्तन योग्य कि अयोग्य हे तपासणे किंवा सत्य असत्या मधला फरक करून सत्याचा स्विकार करण्याची क्षमता आज भारतीय लोकांमध्ये दिसून येत नाही. काही काही लोक तर कोणत्याही गोष्टींचा कोणत्याही प्रकारचा विचार न करता फक्त जोरजोराने घोषणा बाजी, द्वेषात्मक नारे, धार्मिक कट्टरता दाखवून सामाजिक वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न करतात. आणि ही बाब महापुरुषांबद्दल सुध्दा लागु होते. महापुरुषांची जयंती किंवा एखादा उत्सव जवळ आला की दोन चार दिवस तर मेंदु गहाण ठेवल्या सारखेच वागतात. आपल्या वागण्यातून महापुरुषांचा अलमान होतो का सन्मान होतो हे ही त्यांना कळत नाही. ही सवय संपूर्ण भारतीय समाजालाच आहे. आता जानेवारी महिन्यातील २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन जवळ येत आहे आणि वर्षभर झोपी गेलेले देशप्रेमी जागे होऊन आक्रमकपणे सोशल मिडिया, समाज आणि इतर ठिकाणी व्यक्त होऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधाना विषयी दाटून आ लेले बेगडी प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. सर्वात अगोदर हे लक्षात घेणे आवश्यक आहे भारतीय संविधान आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्याही धर्माची, जातीची खाजगी संपत्ती नाही. भारतीय संविधान हे सर्वोच्च आहे आणि त्या नुसार प्रत्येक भारतीय नागरिकांना आपले वर्तन ठेवणे आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महापुरुष आहेत त्यांचे कार्य, विचार व योगदान जागतिक पातळीवरचे आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार न वाचता केवळ बाबासाहेब आंबेडकर यांचा स्विकार केवळ जाती धर्मावरुन करणे हे चुकिचे आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयजयकार करताना किंवा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल नातं सांगताना वैचारिक व देशप्रेम या दोन गोष्टी समोर ठेऊनच सांगावे. ज्यांचा मेंदु गहाण आहे. किंवा ज्यांना फक्त ठराविक दिवशीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण येते ते ढोंगी लोक आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधान हे दोनही विषय दररोज जगण्या साठी आहेत ना की ठराविक दिवशी ओरडून दाखवण्यासाठी. आता सोशल मिडीयावर एक वाक्य जरा जास्तच शेअर होत आहे ते म्हणजे संविधान माझ्याच / आमच्या च बापाने लिहले. तर अशा लोकांना एक सांगणे आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बाप जर जात, आणि धर्म म्हणून मानत असाल तर हा मुर्खपणा सोडून द्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वैचारिक बाप मानत असाल आणि बापाने देशाला दिलेले संविधान या बद्दल जर अभिमान असेल तर संविधानाची जनजागृती करून भारतीय लोकांच्या घराघरात भारतीय संविधान कोणत्याही मान सन्मानाची अपेक्षा न करता पोहचवा तरच त्या वैचारिक बापाचे स्वप्न साकार होईल. परंतु कोणी फक्त जात आणि धर्म बघुन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बाप म्हणून घेत असतील तर त्यांनी अगोदर बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधान वाचावे, म्हणजे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान यांची महती कळेल.

Dr Babasaheb Ambedkar & Indian Constitution    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत करून, स्वतः च्या आरोग्याकडे लक्ष न देता देशाचे कल्याण होण्यासाठी कल्याणकारी संविधान देशाला दिले आणि भारतामध्ये सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्रांती करून इतिहास बदलून टाकला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समतावादी, न्यायवादी होते परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे धार्मिक नव्हते म्हणून त्यांना धर्मात बांधणे हे मुर्खपणाचे आहे. त्यांनी हिंदू धर्मातील विषमता, जातीभेद, कर्मकांड, अंधविश्वास या थोतांडाला कंटाळून समतावादी व न्यायवादी धम्माचा स्विकार केला. धर्म परिवर्तन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धार्मिक नव्हे वैचारिक मंथन करून समता, न्यायवादी धम्माची दिक्षा घेतली. जर बाबासाहेब आंबेडकर यांना धम्माच्या माध्यमातून बाप मानायचे असेल तर अगोदर वरिल गोष्टी आपल्याला पुन्हा बघाव्या लागतील त्या म्हणजे मी बाबासाहेब आंबेडकर यांना बाप मानताना समता, न्याय, यावर चालतो का ? विषमता, अंधविश्वास, कर्मकांड मी सोडून दिले की स्वरूप बदलून तेच सुरू ठेवले आहे याचा विचार करून आत्मपरिक्षण करणे आवश्यक आहे. मुळ मुद्दा हा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची घटना समितीवर निवड होताना त्यांची बुद्धीमत्ता, आणि ते भारतीय आहेत हेच बघितल्या गेले. तेव्हा विषमता एवढी होती की वरच्या जातीतील लोकांच्या लाथा खाण्यात धन्यता होती परंतु खालच्या जातीतील लोकांकडून ज्ञान पाप मानले जायचे म्हणून काही कर्मठ लोकांनी विरोध केला परंपरा शेवटी विजय झाला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्वतेचा. म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याअगोदर आपली वैचारिक पा- तळी व संविधानीक ज्ञान वाढवणे आवश्यक आहे. जेव्हा वैचारिक पा- तळी वाढेल तेव्हा लक्षात येईल संविधान लिहणारा माझा बाप नव्हता तर देशातील सर्वोत्तम विद्वान, आणि सर्वश्रेष्ठ राष्ट्रप्रेमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. म्हणून जातीय भाव- नेतून त्यांना बाप म्हणने म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे कार्य संकुचित केल्या सारखे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे मी प्रथम भारतीय आणि अंतीमतः भारतीय. या वाक्याचा अर्थ खुप गहन आहे. समाजात, देशात वावरताना माझी ओळख फक्त एक भारतीय म्हणून आहे. जात धर्म पंथ वर्ण या सर्व गोष्टी गौन असून मी जात धर्म पंथ वर्ण याही अगोदर एक भारतीय आहे. थोडक्यात काय तर स्वतः, जात, धर्म, वर्ण, पंथ या पेक्षा महत्त्वाचा आहे तो देश आणि हि शिकवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली. म्हणून जातीच्या चष्म्यातून किंवा धर्माच्या चष्म्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगणे हे चुकीचे व अपरिपक्व मानसिकतेचे लक्षण  आहे.

    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक सच्चे भारतीय होते आणि म्हणनुच एवढे प्रभावशाली संविधान त्यांनी धर्मनिरपेक्ष व कोणताही पुर्वग्रह न ठेवता लिहले आणि देशाला अर्पण केले. आमच्या च बापाने आमच्याच साठी लिहले असे ओरड काढणाऱ्यांनी कधी संविधान वाचले नाही. आणि हे जोरजोरात ओरडत असताना दुसऱ्याला वाटतलं संविधान त्यांच्या बाप- त्यांच्या साठी लिहले म्हणून त्यांनी ही वाचले याचा परिणाम संविधान अजूनही लोकांपर्यंत पोहचले नाही. सुशिक्षित प्राध्यापक लोक अक्कल गहाण ठेवल्यासारखे बोलतात की आम्हीही संविधान व डॉक्टर बाबासाहेब यांना मानतो. अरे भाऊ मानतो म्हणजे काय कोणावर उपकार करत नाही. घरातील महिला तुझा पगार सुरक्षित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाने केला. त्यांना मानतो म्हणजे नेमके कोणावर उपकार करतो. संविधान सर्वोच्च आहे त्याला जर नाही मानले देशद्रोहाचा खटला बसतो. परंतु संविधान डोक्यावर घेणाऱ्यांनी वाचले नाही आणि इतरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या जाती साठी लिहले या द्वेष भावनेतून वाचले नाही. काही लोकांसाठी तर संविधान वाचने म्हणजे धर्म संकट आहे कारण खालच्या जातीतील महापुरुषाने लिहले आहे. भारत हा एकमेव देश असेल जेथे बहुसंख्य नागरिकांना संविधानाची जाणीवच नाही. संविधाना कधी बघितले नाही असे धर्मांध लोक केवळ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहले म्हणून ते बदलायला पाहिजे अशी अक्कल पाझरतात पण त्यांना याची जाणीव नसते जे तो बोलत आहे तो अधिकारही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच दिला. बर आजही जातीवाद मनामध्ये एवढा भयंकर रुजलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधान हे बदलायला पाहिजे असे बोलणारे काय लिहले ते न कळणारे तर आहेतच परंतु एका बाबासाहेब आंबेडकर यांना विरोध करताना आपल्याच दोनशे अठ्ठ्यान्नव लोकांना विरोध करतात याचे भानही राहत नाही एवढी है स्वयंघोषित विद्वान लोक.

    घटना समतीमध्ये २९९ सदस्य होते डॉ बाबासाहेब आंबेडकर हे जरी संविधाना चे एक एक कलम लिहत होते परंतु दुसऱ्या दिवशी २९८ सदस्य त्यावर प्रश्न विचारत, त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन समाधान करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. जेव्हा २९८ सदस्यांना ते मान्य होईल तेव्हाच त्याला संविधानामध्ये मान्यता मिळत असे. आज जातिय द्वेषातून संविधान न वाचने म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वगळता महार किंवा अस्पृश्य वर्गातील दुसरे कोणीच नव्हते. मग प्रश्न विचारून मान्य केलेल्या कलमाला आज आपण बदलायचे म्हणतोतर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोडून २९८ त्यावेळच्या विद्वान आणि आपल्याच पूर्वजांच्या बुद्धीमत्तेवर संशय घेतल्या सारखे आहे. याची जाणीव लोकांना नाही. २९८ लोकांच्या प्रश्नांचे समर्पक उत्तरे देऊन आपण मांडलेली बाजू योग्य कशी हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पटवून देऊन कल्याणकारी कारी संविधान निर्माण केले ते एकमेव विद्वान ठरतात. संविधान पूर्वीच्या कायद्यांनी येथील स्त्रिया, माणसे यावर खुप अन्याय अत्याचार केले परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संधी मिळाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना माणुस बनवुन समान केले हा उदारमतवाद जा- तीतुन, धर्मातून किंवा द्वेष भावनेतून येत नाही तर तो येतो देशाप्रती असलेल्या प्रेमातून. म्हणून संविधान कोणाच्या बापाने लिहले असे बोलण्यापेक्षा देशावर खरे प्रेम असणाऱ्या आणि सतत देशाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अग्रेसर असलेल्या जागतिक पातळीवरील अर्थतज्ञ, विधीतज्ञ, क्रांतीकारक म्हणून ज्यांची ओळख आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे आहेत हाच देशाचा जगातील सन्मान आहे. म्हणून भारतीय संविधाना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संबंध जातीधर्माशी न जोडता दोन्ही ही देशाचे अनमोल रत्न आहेत त्याचा मानसन्मान करणे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे.

लेखक - विनोद पंजाबराव सदावर्ते - समाज  एकता अभियान
रा. आरेगांव ता मेहकर  मोबा: ९१३०९७९३००

Satyashodhak, Mahatma phule, Rajarshi Chhatrapati shahu maharaj, dr Babasaheb Ambedkar, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209