हिंगणा - बिहार राज्याच्या धरतीवी महाराष्ट्रात ओबीसींची जात निहाय जनगणना व्हावी, या मागणीकरिता राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसिलरांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिले.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष राजू चौधरी यांच्या नेतृत्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिसर रायपुर हिंगणा येथून मोर्चा हिंगणा तहसील कार्यालयावर धडकला. नायब तहसीलदार दराडे यांनी निवेदन स्वीकारले. ९ जानेवारी २०२० ला महाराष्ट्र विधानसभेचे तत्कालीन सभापती आमदार नाना पाटोले यांनी सभागृहात प्रस्ताव मांडला होता. विधानसभेमध्ये हा प्रस्ताव विधानसभेतील भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय कांग्रेस व शिवसेनेसह सर्व राजकीय पक्षांनी एकमताने मंजूर केला होता. शिंदे व फडणवीस सरकारने प्रस्तावाची त्वरित अंमलबजावणी करावी, असे मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रमुख राजू चौधरी यांनी व्यक्त केले.
तहसीलदार दराडे यांना निवेदन देताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सदस्य सुरेश काळबांडे, हिंगणा तालुका अध्यक्ष चंद्रशेखर राऊत, नागपूर जिल्हा प्रवक्त्या उज्ज्वलाताई बोढारे, दक्षिण पश्चिमचे अध्यक्ष ललितराव देशमुख, ज्येष्ठ पत्रकार विनायक इंगळे, वरिष्ठ पत्रकार लिलाधर दाभे, पत्रकार गजानन ढाकुलकर अनिल चांनपुरकर, पं.स. सदस्य लीलाधर पटले, तालुका कार्याध्यक्ष नीलिमाताई गोबाडे, तालुका युवा अध्यक्ष अरुण कैकाडे, वानाडोंगरी युवा शहराध्यक्ष सतीश सातपुते, आशाताई गुरमुरे, राजू वनवे, राहुल देवगिकर, अनिल मारोडकर, शशिकांत थोटे, सागर भागवत, कमलेश खैरी, विठ्ठलराव बावरे, विक्की कैकाडे, शशिकांत भुजाडे, संजय ठाकरे, वसंता रोडे, ठाणसिंग शेंदरे, संदीप ठाकरे, सोनपुरताई, संगीताताई, राजश्री डावरे, ताराचंद वरखेडे, दामोदर भांगे, सविता गव्हाळे, संगीता सातपुते, ओम कानडे, अरविंद पेटकर, संजय ठाकरे, अनंता शेंडे, संगीता कोरडे, अश्विनी सोनुलकर, बबनरावजी ठाकरे, राकेश उमाळे, सुनील येवले, अरुण धुमाळे, प्रकाश पोजदार, प्रकाश रागडाले, दिनेश्वर हरीणखेडे, राहुल मुथल, सशांत कोपरे, अंकित कैकाडे, प्रणय सहकार, शशिकांत भुजाडे, अतुल राऊत, नामदेव ठाकरे यांच्यासह हिंगणा तालुका राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.