जत दि.१४ जानेवारी २०२३ विश्वगुरू बसवण्णांनी पवित्र मानवता वादी लिंगायत धर्माची स्थापना १४ जानेवारी ११५५ या दिवसी केली म्हणून हा दिवस लिंगायत धर्म स्थापना दिवस ( इष्टलिंग अविष्कार दिवस) म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक १४ जानेवारी २०२३ रोजी बसवण्णा मंदिर मंगळवार पेठ जत येथे इष्टलिंग पूजा, प्रार्थना, वचन पठण करून लिंगायत धर्म स्थापना दिवस साजरा करण्यात आला. जत शहरातील शरण बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती या वेळी होती शरण आणि शरणी यांनी विश्वगुरू बसवण्णा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बसवपूजा केली. यावेळी प्रास्ताविक करताना लिंगायत धर्म प्रचारक आणि प्रसारक तुकाराम माळी यांनी विश्वगुरू बसवण्णा यांच्या कार्याचा परिचय करून देताना सांगितले की विश्वगुरू बसवण्णा यांचा जन्म कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील बागेवाडी जवळच्या इंगळेश्वर येथे ३०एप्रिल ११३४ रोजी झाला.
बसवण्णा यांच्या वयाच्या आठव्या वर्षा मुंज म्हणजे उपनयन करण्यासाठी घरातील मंडळींनी आग्रह धरला. परंतु बसवण्णा कुशाग्र बुद्धिमत्तेचे चिकित्सक होते. आपल्या पेक्षा मोठी असलेली मोठी बहिण हिची मुंज न करता माझी मुंज केली जाते हा कुठे तरी स्त्री आणि पुरुष यांचे मध्ये असलेल्या भेदभावाविरूध्द बंड करुन गृह त्याग करुन घराबाहेर पडले आणि ते कुडल संगम येथील ईशान्यगुरू यांच्या आश्रमात विध्याभ्यास करून ज्ञानार्जन करू लागले.त्यानी या काळात वेद,पुराण,उपनिषदे इत्यादींचा अभ्यास केल्यानंतर त्याना एका स्वतंत्र अतिशय चांगल्या धर्माची त्यांना गरज वाटली.त्यांना विविध धर्मातील काही तत्वे आवडली असली तरी संपूर्ण तृप्ती प्राप्त झाली नव्हती.
१४ जानेवारी ११५५ रोजी बसवण्णा यांना असे वाटले की लोकांमध्ये प्रचलित असलेल्या उपासना वस्तू विचित्र आणि विलक्षण असून परिपूर्ण नाहीत.म्हणून त्यांना विश्व आकाराचा इष्टलिंग अविष्कार झाला. अशा प्रकारे विश्वगुरू बसवण्णांनी पवित्र अशा लिंगायत धर्माची स्थापना केली. विश्वगुरू बसवण्णा यांचे विचार मानव कल्याणाच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण आहेत. म्हणून सर्वांनी विश्वगुरू बसवण्णांनी पवित्र अशा दिलेल्या लिंगायत धर्माचे काटेकोरपणे पालन करून आपली जीवनशैली उच्चतम ठेवावी. यावेळी ज्येष्ठ लिंगायत धर्म प्रचारक धानाप्पाण्णा पट्टणशेट्टी यांनी विश्वगुरू बसवण्णा यांची वचने सांगून मराठीत अर्थ सांगितले.युवक लिंगायत नेते शिवकुमार दुगाणी यांनी लिंगायत धर्माचे आणि इष्टलिंग पूजा, विभूती धारण, या विषयी माहिती सांगितली, शरणीनी वचन गायन करून मराठीत अर्थ सांगितले. शेवटी मंगळा आरती होऊन कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमानिमित्त तुकाराम माळी, धानाप्पाण्णा पट्टणशेट्टी सौ.मिनाक्षी अक्की,शिवानंद आरळी, अशोकराव दुगाणी, धानाप्पाण्णा ऐनापूरे, बाबू ऐनापूरे, सतीश मोदी,शिवकुमार दुगाणी, विजय पट्टणशेट्टी, मल्लाप्पा कंगोणी, सौ.पट्टणशेट्टी मॅडम, सौ.पट्टणशेट्टी आदीजन उपस्थित होते.
Satyashodhak, obc, Bahujan