नागपूर, - भारताने लोकशाही स्वीकारली याचा अर्थ लोकांच्या सेवेसाठी शासन - प्रशासन, सर्वांनमध्ये समानता, उच्चनिचतेचा भाव, श्रीमंत- गरीबीचा भेद संपून एकसंघ राष्ट्राची निर्मीती. जात, धर्म, पंथ, संप्रदाय ह्या सर्व मानवनिर्मीत कल्पना आहे पण बलाढ्य राष्ट्रनिर्मीतीच स्वप्न या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात संत-महापुरूषांनी बघितले. सर्व मानवानां समान हक्क, स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता या तत्वावर संविधानाची निर्मीती करून ते संविधान 26 जानेवारी 1950 ला भारताने सर्वानुमते स्विकारले. या देशाला अनेक तुकड्या विभागण्याचे प्रयत्न मजबूत संविधानाने हानुन पाडले. आशिक्षीत गाडगेबाबा आणि अल्पशिक्षीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नावाने विद्यार्थ्यांना शिक्षीत करणारे विद्यापीठ असू शकतात. या महापुरूषांच्या विचारावर, साहित्यावर अभ्यासक्रम असून त्यावर विद्यार्थी शिकून डॉक्टरेट करतात. हीच भारतीय संविधानाची खरी ताकत आहे. असे प्रबोधन प्रजासत्ताक दिनानिमीत्त आयोजीत विद्यार्थी समारंभात ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक यांनी केले.
संत गाडगे महाराज बहुउद्देशीय शिक्षण संस्था द्वारा संचालित निवासी मुक बधिर विद्यालय हुडकेश्वर मार्गावरील पीपळाफाटा येथील प्रांगणामध्ये आयोजीत झेंडावंदन समारंभात ज्ञानेश्वर रक्षक प्रबोधन करतांना पुढे म्हणाले, डी.डी. सोनटक्के या माणसाने जीवनात खऱ्या देवांना शोधले मूकबधीरांच्या रूपाने त्यांना सुसंस्कारीत करण्याच कठीन काम येथील गुरूजन करतात हेच खरे आधुनीक तीर्थक्षेत्र आहे. या समारंभाचे अध्यक्ष रविन्द्रजी चव्हान यांनी संस्थेच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. पालक पडधानयांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख अतिथी डॉ. डी.बी. चौधरी, अशोक क्षीरसागर, वासुदेव रक्षक, बंडू वैद्य, रूकेशजी मोतीकर, उपस्थित होते. संस्थेचे राहुल सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात, मुख्याध्यापक राजेश खांडेकर आणि इतर शिक्षकवृंदानी परीश्रम घेऊन मुकबधीर विद्यार्थ्यांचे राष्ट्रभक्तीपर नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे संचालन शाळेच्या विषेश शिक्षिका शुभागी ठाकरे आणि आभार वैशाली अतकरे यांनी केले.