स्त्रियांना पुरूषी सत्तेच्या अधीन ठेवण्यास भाग पाडणारी मनुस्मृती पूर्णपणे जळाली का ?

लेखिका - रुक्मिणी नागापुरे, बीड, एकल महिला संघटना, मो. नं. 9049025415 

    देशात गेली शेकडो वर्षे जातीच्या नावाखाली अन्याय आणि अत्याचार केले गेले. रुढी आणि परंपरांच्या नावाखाली दलित, बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात येऊ दिले गेले नाही, यासाठी मनुस्मृतीचा वापर केला गेला आणि दलित समाजावर अत्याचार सुरूच राहिले. पण या अन्यायी रुढी - परंपरांचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृतीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुमारे ९५ वर्षांपूर्वी दहन केले. पण तरीही ही मनुस्मृती पूर्णपणे जळालेली आहे का ?? की अजूनही ती अनेकांच्या रक्तात आणि मनात आजही भिनलेली आहे.

    मनुस्मृतीने केवळ दलित समाजावर अन्याय केला असे नाही तर स्त्रियांनाही पुरूषी सत्तेच्या अधीन ठेवण्यास मनुस्मृतीने भाग पाडले आहे. जाळून टाकावा मनुग्रंथ, असं महात्मा जोतिराव फुलेंनीही आधीच्या शतकात म्हटलं होतं. परंतु, त्यांचे ते शब्द प्रत्यक्षात उतरायला आणखी काही वर्षे जावी लागली आणि २५ डिसेंबर १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंच्या त्या शब्दांना, भावनेला मूर्त स्वरूप दिलं. जी मनुस्मृती अस्पृश्यतेचं, वर्णभेदाचं, जातिव्यवस्थेचं, स्त्रीच्या गुलामगिरीचे समर्थन करते त्या मनुस्मृतीचं डॉ बाबासाहेबांनी महाडच्या चवदार तळ्याकाठी जाहीर दहन केले.

Did the Manusmriti that forced women to submit to male power burn out completely    २५ डिसेंबर १९२७ रोजी झालेला हा सर्व घटनाक्रम आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. शालेय शिक्षणापासून आपण तो वाचत आलेला आहोत. प्रश्न असा आहे कि डॉ बाबासाहेबांनी दहन केलेली मनुस्मृती पूर्णपणे जळाली का ? तर त्याचे प्रामाणिक उत्तर आहे- नाही !! एक तर डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती का जाळली जे पुस्तकावर इतके प्रेम करणारे व पुस्तकासाठी घर बांधणारे, असे बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तक जाळले याच्या मागे काय उद्देश होता ? आणि तो उद्देश सफल झाला का ? शतकानुशतके इथल्या तथाकथित उच्चवर्णीयांच्या रक्तात भिनलेली मनुस्मृती नष्ट झालेलीच नाही. उलट मागील काही वर्षा पासून ती डोक वर काढत असल्याचं दिसतंय. मनुस्मृतीने निर्माण केलेली वर्ण व्यवस्था जरी मागे पडली आसली तरी जातीव्यवस्था मात्र आजही आपलं अस्तित्व टिकवून आहे. आणि ही जातीव्यवस्था समानतेच्या तत्वाला मारक आहे. मनुस्मृतीने चार पैकी चौथा वर्ण मानल्या गेलेल्या क्षुद्र वर्णावर हजारो वर्षे जुलुम आणि अत्याचार केले पण आपण हेही लक्षात घेतले पाहीजे की, मनुस्मृतीने चारही वर्णातील स्त्रियांवर दोन काकन जास्तच जुलूम केला.

    सतीची चाल, केशवपन सारख्या प्रथा जरी बंद झाल्या असल्या, शिक्षणाचा अधिकार जरी मिळाला असला तरी स्त्रिया वर रूढी आणि परंपरांनी घालून दिलेली बंधने आजही समाज व्यवस्थेमध्ये रूढ आहेत. या व्यवस्थेत सर्व खाली महिलांना ठेवलं आहे. आजही स्त्रीला तिच्या बालपणी पित्यावर, तरुणपणी पतीवर, आणि म्हातारपणी मुलावरच विसंबून राहावं लागतं. आज समाजात पाहिले तर विधवांना त्या काळी असलेल्या समस्या आज ही त्याला सामोरे जावे लागते, आज ही शिक्षण सर्व तळागाळातील लोकांना घेण्यासाठी प्रयत्न केले जात नाही.

   आजच्या स्थितीत देखील गरिबीमुळे बहुजन समाज आहे तिथेच आहे, मनुस्मृती सांगितले की, शूद्रांना संपत्ती जमा करण्याचा अधिकार नाही तर ती परिस्थिती बदलली नाही. आज महिलांच्या अनेक अन्याय व अत्याचार सहन करावा लागतो. आज ही महिलांना संपत्ती मध्ये संविधानाने समान अधिकार दिले तरी तिची सासरी व माहेरी दोन्ही संपत्तीमध्ये अधिकार पासून वंचित ठेवले जाते. आज ही महिलांना समाजात वावरताना समानतेची वागणूक नाही इतकेच काय तर पुनर्विवाह देखील सोयीने करून घेतले जातात तेही जर स्त्रीला संपत्ती असेल तर तिला दबावात आणून तिच्या संपत्तीवर अधिकार कुणाला जाऊ नये, घेऊ नये म्हणून लग्न घरातील व्यक्तीसोबत करून दिले जाते.

     त्या घरातील पुरुष सर्व काही महिला व संपत्ती यावर अधिकार गाजवतात. आरक्षण असून ही महिलांना तिच्या हक्कापासून दूर ठेवले जाते. आपण सर्व धर्मातील स्त्रियांनी कोटी कोटी आभार मानले पाहिजेत. त्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेबांचे ज्यांनी स्वातंत्र्योत्तर काळात संविधानाच्या माध्यमातून दलितांना बहूजनाला तर न्याय मिळवून दिलाच पण हिंदू कोड बिल संसदेत मांडून दलितांपेक्षाही महिलांना अधिक अधिकार दिले, स्त्री पुरुष समानता आणून महिलांना त्यांच्या प्रगतीच आकाश मोकळं केलं.

    आता जिमेदारी महिलांची आहे, आपलं स्वातंत्र्य अबाधीत ठेवण्याची रूढी परंपरांचा त्याग करण्याची शिक्षणाची कास धरून विज्ञानवादी दृष्टिकोन बाळगण्याची.

   डॉ. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली नसती तर बहुजन समाजाला गुलामगिरीच्या बेड्यातच अडकवून ठेवले असते म्हणुन आपल्या वर बाबासाहेबांनी खुप उपकारच केले आहेत.

जय भीम ! जय संविधान ! जय भारत !!!

Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209