हंसराज अहीर : मागासवर्गीय आयोगाचा कार्यभार स्वीकारला नवी दिल्ली मराठा समाजाला ओबीसीमध्ये स्थान देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शिफारस केल्यास सकारात्मक विचार करू, अशी माहिती राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष हंसराज अहीर यांनी पत्रकारांना दिली. केंद्र सरकारने राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी शुक्रवारी पदाचा कार्यभार स्वीकारला. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मराठा समाजाला ओबीसीचे आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारची केंद्र सरकारला शिफारस आवश्यक आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडून प्रस्ताव आल्यानंतर यावर विचार करण्यात येईल.