सिंदखेड राजा - ओबीसी जातनिहाय जनगणना रोखणाऱ्यांना ओबीसींनी ओळखून धडा शिकववावा, असे आवाहन बामसेफ, बहुजन क्रांती मोर्चा व सहकारी संघटनांची मागणी केली आहे.
सिंदखेडराजात येथे विविध संघटनांची तालुकास्तरीय बैठक पार पडली. या बैठकीला बामसेफ जिल्हाध्यक्ष गोवर्धन गवई, आरएमबीकेएस जिल्हा कोषाध्यक्ष सतिश मोहोड, एमबीकेएस जिल्हाध्यक्ष प्रकाश जवजाळ, राष्ट्रीय किसन मोर्चाचे जिल्हा प्रभारी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे देशद्रोही संघटन कशी आहे, ओबीसी जातनिहाय जनगणना ही ओबीसींसाठी किती गरजेची आहे, शिक्षणाचे असंविधानिक खाजगीकरण भारतीय समाजाला कसे उध्वस्त करणार आहे. या विषयावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी बामसेफ तालुकाध्यक्ष डॉ. भिमराव म्हस्के, राष्ट्रीय पिढडा वर्ग मोर्चाचे जिल्हा संयोजक मौर्य आकाश मेहेत्रे, ओबीसी अधिकारी कर्मचारी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय ठाकरे, अखिल भारतीय माळी महासंघाचे तालुका सचिव दत्तात्रय खरात, प्रोटान तालुकाध्यक्ष रणजित मेहेत्रे, राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्च तालुकाध्यक्ष ठकाजी तिडके, तालुका सचिव लक्ष्मण आढाव, प्रोटान सचिव गणेश मेहेत्रे, आरएमबीके तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर काकडे आदी उपस्थित होते.