नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या निर्मितीला 100 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त होणाऱ्या विद्यापीठीय कार्यक्रमांना ऐतीहासीक महत्व आहे. 2005 मध्ये नागपूर विद्यापीठाचा नाम विस्तार होऊन थोर विचारवंत, साहित्यिक, लोकसंत, फिलॉसॉपर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच नाव विद्यापीठाने धारण केले. 2005 नामविस्तारानंतर प्रथम कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण यांनी विद्यापीठाला या भारतात बंधूभाव नित्य वसू दे..... हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित गीत विद्यापीठगीत म्हणून स्वीकारले.
आज हे विद्यापीठ गीत विद्याथ्यांच्या मनामध्ये मानवतेचा जागर करीत राष्ट्रीय एकात्मतेचा भाव जागवते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच साहित्य जनमाणसात तरूणपीढीमध्ये पोहचावे म्हणून, राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्य संमेलनाची परंपरा विद्यापीठाने महाराष्ट्राच्या विविध भागात साहित्य संमेलन घेऊन पाच वर्ष पूर्ण केली. सध्या ती परंपरा खंडीत झाली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन महाराष्ट्र शासनाच्या आर्थीक मदतीतून सुरू झाले. माजी कुलगुरू डॉ. सपकाळ यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्यावर एम.ए. राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी सीलॅबस करायला विद्यापीठातील राष्ट्रसंत तुकडोजो अभ्यास मंडळाला प्रेरीत केले. काही विद्वानांनी हा अभ्यासक्रम सुरू होऊ नये म्हणून प्रयत्न केला. पण तत्कालीन कुलगुरू डॉ. सीद्धार्थ विनायक काणे यांनी 2015 मध्ये अभ्यासक्रम सुरू केला. आज विद्यार्थी या अभ्यासक्रमात शिकत आहे. या अभ्यासक्रमाला युजीसीच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे. कारण सक्षमरीत्या हा अभ्यासक्रम सुरू राहायला हवा.
आताचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी सातत्याने प्रयत्न करतात की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार विद्याथ्यांसोबतच जनमाणसात विविध उपक्रमाने जावेत. नुकतीच एक पत्रिका विद्यापीठीय व्याख्यानमालेची हाती पडली. त्यावर लिहीले आहे. राष्ट्रसंत व्याख्यानमाला हे कोण राष्ट्रसंत ? नुकतेच नागपुरात एका जैनमुनी यांचे प्रवचन झाले. त्यांना पण राष्ट्रसंत म्हणूनच संबोधले जाते. तसेच या पत्रिकेतील व्याखानाचा विषय युगनायक राम संदर्भ संत तुलसीदास राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्याशी कुठेही संबंधित नाही. विद्यापीठाच्या 100व्या वर्धापनानिमित्त ही व्याख्यानमाला आहे. तीला अनन्य महत्व आहे. या विषयातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्याला न्याय मीळणार आहे काय? याचे चिंतन विद्यापीठ स्थरावरून व्हायला हवे.