ओबीसी जनता या देशाचा कणा आहे - राहुल गांधी

ते पायापासून जन्मलेले शूद्र नाहीतः राहुल गांधी

जातीनिहाय जनगणना याच सरकारच्या काळात व्हावी म्हणून काँग्रेसचा पुढाकार

     खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते जम्मू काश्मीरपर्यंत काढलेली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाल्याच्या १४ व्या दिवशी १९ नोव्हेंबरला जळंब (शेगाव) येथे दुपारी २ च्या सुमारास दलित आणि ओबीसी यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी राहुल गांधीसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती.

    त्या निमित्ताने ओबीसी प्रतिनिधी मंडळात डॉ. लता प्रतिभा मधुकर ओबीसी अभ्यासिका, राम वाडिभस्मे प्रदेश सरचिटणीस ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ व शरद वानखेडे यांनी आपले मुद्दे राहुल गांधी समोर ठेवले. तर दलित प्रतिनिधी मंडळात रावसाहेब कसबे, उत्तम कांबळे आणि चेतन शिंदे होते.

OBC Samaj is the backbone of this country Rahul Gandhi    ओबीसी अभ्यासिका डॉ. लता प्रतिभा मधुकर म्हणालेत की, बाहेर अनेक लोक राहुल गांधी, ओबीसीबद्दल अजून काहीच भूमिका घेत नाही, मंडल आयोगाच्या पूर्ण शिफारशी लागू करण्यात याव्यात.

    राम वाडिभस्मे प्रदेश सरचिटणीस ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ यांनी १६ नोव्हेंबरला नोकरीतील आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला (इंदिरा साहनी) येऊन ३० वर्ष झालीत. मात्र ओबीसींचा नोकरीतील अनुशेष पूर्णपणे भरलेला नसून फक्त १९ टक्केच ओबीसी नोकरीमध्ये आहेत. नॉन क्रिमिलेअरची मर्यादा दर तीन वर्षांपासून वाढलेली नसून ती वाढायला हवी व तिची मर्यादा २० लाखाच्या पुढे हवी. मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची निर्मिती व्हावी. शिष्यवृत्तीची उत्पन्न मर्यादा दीड लाखवरून वाढ व्हायला हवी. उच्च शिक्षणात वर्ष २०१५-१६ पेक्षा मध्ये ओबीसी २०१९-२० विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे. परंतु प्राध्यापकांचा अनुशेष अजूनही रिक्त असल्याचे मुद्दे उपस्थित केले.

    शरद वानखेडे राष्ट्रीय ओबीसी महासंघ यांनी जातीनिहाय जनगणनेची मागणी करीत काँग्रेस सरकारच्या काळात हा विषय मार्गी निघावा, असे ते बोलले.

    हे सर्व विषय एकूण त्यांनी आपली भूमिका मांडताना राहुल गांधी म्हणालेत की, शूद्र किंवा ओबीसी अशी ओळख मला पटत नाही. मनुस्मृती म्हणते, शूद्र पायातून जन्मले. पण मी म्हणतो, ओबीसी हा | वर्ग उत्पादक असून या देशाचा कणा आहे. कणा मजबूत नसेल तर सर्व | शरीर कोसळून जाईल. त्यामुळे या वर्गाने मजबुतीने व एकजुटीने पुढे येणे गरजेचे आहे.

    जातीनिहाय जनगणनेच्या  संबंधाने राहुल गांधी म्हणाले, मी प्रधानमंत्री होण्याची वाट कशाला बघता ? ती करण्यासाठी या सरकारवर दबाव टाका आणि केली नाही तर तुम्ही असे सरकार निवडणार आहात का, अजून दहा वर्षांसाठी ? जातीवार जनगणना झालीच पाहिजे, अशीच माझी भूमिका आहे. आणि सर्व उत्पादकांनी स्वतःची उत्पादने यावर मालकी प्रस्थापित केली पाहिजे आणि आपल्या कामाचा सन्मान करायला हवा, असेही ते बोललेत.

    पुन्हा एकाच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणालेत, हिंदुत्ववादी सरकार ओबीसीचे लक्ष, स्वतःच्या सन्मानाने जगण्याच्या प्रश्नावरून वळवत आहे. तुम्ही आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध लढू नये म्हणून कधी हिंदू-मुस्लिम तर कधी रामाला ते समोर करत असून मुख्य मुद्यावरून भटकविण्याचे प्रयत्न करीत आहेत. या बैठकीला काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

 

Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209