कुऱ्हे पानाचे येथे रविवारी सत्यशोधक समाज संघाच्या जिल्हा संयोजन समितीची बैठक संपन्न झाली. त्यात दि. ११ डिसेंबर रोजी कुडे पानाचे ( ता. भुसावळ) येथे अधिवेशन घेण्याचे ठरले आहे. अधिवेशनचे स्वागताध्यक्ष म्हणून मुकुंद सपकाळे तर कार्याध्यक्ष म्हणून सुधाकर बडगुजर यांची निवड करण्यात आली. अधिवेशनाचे अध्यक्ष तथा उद्घाटक आमदार शिरीष चौधरी हे असतील. अधिवेशनात जळगाव जिल्ह्याचा सत्यशोधक चळवळीचा इतिहास, शेती, शिक्षण व महात्मा फुले यांना अपेक्षित कृषी संस्कृती याविषयांवर चर्चा होणार आहे. सत्यशोधक चळवळीचे अभ्यासक, संशोधक प्रा. जी.ए. उगले (पैठण) फुले-आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार प्रा. प्रल्हाद लुलेकर (औरंगाबाद) व भारतीय कृषी संस्कृतीचे भाष्यकार डॉ. राजेंद्र कुंभार (कोल्हापूर ) आदी मान्यवर चर्चेत सहभागी होणार आहेत. बैठकीला प्रमोद उंबरकर, विजय लुल्हे, नाना पवार, रवींद्र तितरे, प्रमोद पाटील, समाधान बारी, रमेश वऱ्हाडे, राजू जाधव, कैलास जाधव, भगवान रोकडे, हारून मन्सूरी, विश्वास पाटील, मोतीराम महाजन, लक्ष्मण पाटील, कविराज पाटील, अरविंद बावसकर, जयसिंग वाघ, सुरेश झाल्टे, अरविंद खैरनार, संजय वराडे उपस्थित होते.