विचारवंतांनी राजर्षी छ. शाहूंचे कार्य जगभर पोहोचवावे

प्रा. डॉ. हरी नरके : न्यू कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

   शाहू महाराजांचे विचार हे केवळ आपल्यालाच नाही, तर संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी असून, त्यांचे कार्य जगभर पोहोचविण्याची जबाबदारी सध्याच्या पिढीच्या अभ्यासक, विचारवंत आणि संशोधकांची आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या महात्मा फुले अध्यासन केंद्राचे संचालक प्रा. डॉ. हरी नरके यांनी केले. ते शुक्रवारी न्यू कॉलेजमध्ये आयोजित 'राजर्षी शाहू छत्रपती : दृष्टिकोन, योगदान व समकालीन 'प्रस्तुतता' या विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

Thinkers called Rajarshi Ch Shahu work should be spread all over the world   राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार होते. प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डॉ. एम. ए. नायकवडी, प्रा. अभिषेक श्रीराम यांनी केले. परिषदेच्या प्रारंभी शाहीर आझाद नायकवडी यांनी शाहिरी पोवाड्याचे सादरीकरण केले.

   या परिषदेत देश-विदेशातून आलेल्या दोनशेहून अधिक संशोधकांनी सहभाग घेतला असून, विविध भाषांतील निवडक ८० शोधनिबंधांच्या 'नवज्योत' या संशोधन पत्रिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. समन्वयक डॉ. अर्चना कांबळे यांनी आभार मानले.

   यावेळी हुतात्मा उद्योग समूह, वाळवा प्रमुख वैभव नायकवडी, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे चेअरमन के. जी. पाटील, उपाध्यक्ष डी. जी. किल्लेदार, संचालक विनय पाटील, डॉ. पी. के. पाटील, वाय. एल. खाडे, आर. डी. पाटील, सी. आर. गोडसे, सविता पाटील, सई खराडे, इतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव, प्रा. डी. यू. पवार, वसंतराव मुळीक उपस्थित होते.

Satyashodhak, obc, Mahatma phule, Rajarshi Chhatrapati shahu maharaj, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209