सांगली : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे सत्ताधारी नेते आणि अन्य राजकीय पक्ष जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, बळीराजा पार्टी यावर राज्यभर आवाज उठवेल, असे प्रतिपादन शेतकरी नेते बाळासाहेब रास्ते यांनी केले. बळीराजा पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवडीबद्दल विविध पक्ष, संघटनांतर्फे सांगलीत शुक्रवारी त्यांचा सत्कार झाला, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, सत्ताधारी व इतर राजकीय पक्षांचे साटेलोटे आहे. स्वतःची झोळी भरण्यात मग्न आहेत. कामगार नेते शंकरराव पुजारी अध्यक्षस्थानी होते. त्यांच्या हस्ते फुले पगडी व बळीराजाची प्रतिमा देऊन रास्ते यांचा सत्कार करण्यात आला. शशिकांत डांगे यांनी प्रास्ताविक केले. चंद्रकांत गायकवाड यांनी स्वागत केले. यावेळी गोविंदराव खटावकर, अविराजे शिंदे, तानाजी जाधव, सुनील गुरव, आनंदराव नलगे-पाटील, शिवाजी त्रिमुखे, आकाश तिवडे, प्रभाकर भोरे, भीमराव बेंगलोरे, शहाजी हराळे, शांता बागडे यांनी मनोगत व्यक्त केले. अमोल भोसले यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विनायक जाधव, मनोहर रास्ते, बाबा पाटणे, संजय सदामते, दादू सदामते, विठ्ठल रास्ते, डॉ. सदाशिव कांबळे, तायाप्पा गोडबोले, गणेश शिंदे, मोझेस हेगडे, प्रमोद रास्ते, नागनाथ माने, राजेश साळुंखे उपस्थित होते.