अमरावती - साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या संवेदना बहुद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित पहिले सातपुडा साहित्य संमेलन अमरावती येथे नियोजित असून जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होत असलेल्या या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ख्यातनाम साहित्यिका प्रा. डॉ. शोभाताई रोकडे व स्वागताध्यक्ष म्हणून जेष्ठ साहित्यिक व माजी सिव्हिल सर्जन श्री श्यामसुंदर निकम यांची सर्वानुमते घोषणा करण्यात आली आहे. संवेदना बहुद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील प्रतिष्ठित व नामांकित अशी संस्था असून, या संस्थेच्या वतीने वर्षभर विविध साहित्यिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. त्याचाच एक भाग म्हणून पहिले सातपुडा साहित्य संमेलन नुकतेचं घोषित करण्यात आले असून आगामी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडयात अमरावती येथे होत असलेल्या या साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी ख्यातनाम साहित्यिका प्रा. डॉ. शोभाताई रोकडे व स्वागताध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक तथा माजी सिव्हिल सर्जन अमरावती श्री श्यामसुंदर निकम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून संस्थेच्या वतीने दि. १२ नोव्हेंबर रोजी झालेल्या मीटिंगमध्ये सदर दोन्ही नावांची घोषणा करून त्यावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले. यावेळी संवेदना बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गजानन काकडे, उपाध्यक्ष विशाल मोहोड, सचिव सुयोग राजनेकर, कोषाध्यक्ष सारंग ताथोड, सहसचिव अजय अडिकने, सदस्य खुशाल गुल्हाने, विशाल कन्हेरकर, अंकुश वानखडे व गौरव कांडलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan