मंत्रालयाच्या दर्शनी भागात असलेली वैराग्यमूर्ती गाडगेबाबांची दशसूत्रीचे फलक शासनाने हटवले असून याचा तिव्र निषेध महाराष्ट्रभर होत आहे.आज दि.२ आक्टोबरला म. गांधी यांच्या जयंती दिनी संभाजी ब्रिगेड व गाडगेबांच्या जन्मस्थळातील गावकर्यांनी भजन आंदोनलन करित दशसुत्री लावली नाही तर तिव्र आंदोलन करण्याचा ईशारा दिला.महाराष्ट्रातील थोर संत कर्मयोगी गाडगेमहाराजांची दशसुत्री उद्धव ठाकरे सरकारच्या काळात मंत्रालयात लावून गाडगेबांच्या विचारावर हे सरकार चालेल असे आश्वासन दिले होते.परंतू सहा महिन्याअगोदर महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाली सरकार बदलले,आणि काही दिवसाअगोदर गाडगेबाबांची दशसुत्रीही हटवण्यात आली.पुरोगामी महाराष्ट्रात गाडगेबांच्या विचाराला मिटवण्याचा प्रयत्न असल्याच्या प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असतांना संभाजी ब्रिगेडने महात्मा गांधीच्या जयंती दिनी संपुर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
अंजनगांव सुर्जी तालूक्यातीला संभाजी ब्रिगेड ,जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गाडगेबांच्या जन्मगावी जाऊन भजन करित आंदोलन केले. यावेळी गावकऱ्यानी सुद्धा आंदोलनात सहभाग घेत दशसुत्री लावा, अन्यथा तिव्र आंदोलन करु असा ईशारा दिला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक प्रा. प्रेमकुमार बोके, तालुका अध्यक्ष शरद कडू, जेष्ठ पत्रकार सुरेशदादा साबळे, शरद काकड, अरुण धोटे, उमेश काकड, शरद साबळे, अमर धोटे,गणेश काकड, किरण साबळे,अभिषेक देशमुख ,पुर्वेश शेरकर, कौस्तुभ पानझडे, प्रा. राजेश तायडे जिजाऊ ब्रिगेच्या सिमा बोके, स्मिता घोगरे, मिना कोल्हे, सारिका मानकर, शितल बोके, निता हरणे, प्रतिभा काटकर, माधुरी काटकर, मंगला गिते, राजकन्या काळे, शारदा काटकर, येवले, मालवे, काळे सह गावकरी आंदोलनात सहभागी होते.