दि.२१ सेप्टेंबर २०२२ - महाराष्ट्र राज्यातील लिंगायत धर्मीयाची शाळेच्या दाखल्यात जात म्हणून लिंगायत म्हणून नोंद झालेली आहे.लिंगायत जात नसून धर्म असल्याने ओबीसी लिंगायताना जातीचे दाखले मिळत नाहीत.लिंगायत धर्मातील सर्वच जाती याकायक वर्गीय म्हणजे कारागीर असल्याने तसेच प्रत्यक्ष जात ही महाराष्ट्र राज्य सरकारने ओबीसी सवलत दिलेल्या यादीतअसून सुद्धा यादी प्रमाणे ओबीसी जातीचा दाखला मिळत नाही. म्हणून लिंगायत धर्मीयांना ओबीसी जातीचा दाखला मिळण्यासाठी एकाचवेळी एकदम पन्नासच्या पटीत प्रांताधिकारी यांचेकडे दाखल्याची मागणी करुन सामुदायिक संघटीत रीतीने दाखले काढण्याचे ठरले. जातीचे पुरावे उपलब्ध होण्याची कागदपत्रे मिळविण्याचे स्त्रोतांचा उपयोग करणे तसेच शासनाचे जीआर इतर आधाराचा उपयोग करून जातीचे दाखला मिळवून देण्याचे नियोजन झाले. तासेच मुस्लिम धर्मीयाप्रमाणे गृहचौकशी करुन त्या व्यक्तीची जात ठरवून दाखले देण्याची मागणी करण्यात येणारआहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीमध्ये ओबीसींना आरक्षण मिळाले असले तरी जातनिहाय जनगणना करण्याचा केंद्र सरकारने घेतल्याशिवाय आणि मंडल आयोगाच्या सर्व शिफारशी आणल्या शिवाय ओबीसी चळवळीचे आंदोलने थांबणार नाहीत.यावेळी तुकाराम मळी, धानाप्पा पट्टणशेट्टी अनिल, अशोकराव, दुगाणी, शिवकांत आरळी, सरवेसकुमार माळी, विनोद माळी, रविंद्र सोलनकर, मुबारक नदाफ, श्रीशैल उमराणी आदी उपस्थित होते.