आठ महिन्यानंतरही ओबीसी विद्यार्थ्यांना 'टॅब' मिळेना

प्रशिक्षण नावापुरतेच : महाज्योतीचा लेटलतिफ कारभार सुरूच ; डाटाही झाला फुर्रर

      नागपूर ओबीसीतील अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना 'नीट' आणि 'आयआयटी'मध्ये टक्का वाढविण्यासाठी महाज्योतीच्या माध्यमातून आठ महिन्यांपासून ऑनलाइन प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यासाठी अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना पुस्तके आणि 'टॅब' सह सहा जीबी डाटा देण्याचे ठरले होते. मात्र, अद्याप या विद्यार्थी 'टॅब'च्या प्रतीक्षेत आहेत. प्रशिक्षण संपल्यावर टॅब देणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

Mahajyoti Even after eight months OBC students do not get tab     ओबीसीमधील अकरावी आणि बारावीच्या ओबासी विद्यार्थ्यांना नीट आणि आयआयटीमध्ये स्थान मिळावे यासाठी १२ हजारावर विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्याचे ठरले. यासाठी त्यांना पुस्तके टॅब आणि ऑनलाइन प्रशिक्षणासाठी सहा जीबी मोबाईल डाटा देण्याची घोषणा महाज्योतीने जाहिरातीत केली होती. मात्र, ७ डिसेंबर २०२१ ला सुरू झालेल्या ऑनलाइन प्रशिक्षणात आतापर्यंत म्हणजेच सात महिन्यांचा कालावधी निघून गेला असतानाही, त्यांना डाटा सोडाच पण 'टॅब'ही मिळालेले नाहीत. त्यामुळे पुढच्या परीक्षेत ते कोणते दिवे लावणार याबाबत शंका आहे.

     विशेष म्हणजे, प्रशिक्षणात सहभागी असलेले विद्यार्थी हे बहुतांश ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थी आहेत. त्यांची साहित्य खरेदी करणे वा टॅब घेण्याची आर्थिक स्थिती नाही. त्यामुळे महाज्योतीचे ऑनलाइन प्रशिक्षण नावापुरते उरले असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

    प्रशासन निरुत्तर -

    यापूर्वी महाज्योतीचे व्यवस्थापक प्रदीप डांगे यांच्याशी संपर्क केला असता. त्यांनी तांत्रिक प्रक्रियेमुळे 'टॅब' देण्यास उशीर होत असल्याचे स्पष्ट करीत, टॅबसाठी जानेवारी महिन्यात प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे सांगून विभागाकडून ते उशिरा मिळाल्याने उपलब्ध होऊ शकलेले नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, प्रक्रिया सुरू असून त्यांना लवकरच त्याचे वाटप करण्यात येईल असेही सांगितले. मात्र, याला एक महिना झाला असतानाही अद्याप टॅब न मिळाल्याने इतरा उशीर का होतो आहे, हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे आता या प्रश्नावर प्रशासनही निरुत्तर असल्याचे दिसून येत आहे.

 

Satyashodhak, obc, Mahatma phule, Rajarshi Chhatrapati shahu maharaj, dr Babasaheb Ambedkar, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209