ओबीसींची जातनिहाय जनगणना सरकारने करावी

धरणे आंदोलन करून मंडल दिन साजरा

      औरंगाबाद : ओबीसींची जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे या मागणीसाठी ओबीसी चळवळीतील विविध संस्थासंघटनांनी रविवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. मंडल दिनाचे औचित्य साधून हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, १० ऑगस्टला विभागीय आयुक्तांना निवेदन सादर केले जाणार आहे. नॉन पॉलिटिकल ओबीसी, एससी-एसटी सोशल फ्रंट, पिछडा ओबीसी शोषित संघटन, महाराष्ट्र राज्य ओबीसी जनजागरण व संघर्ष समिती, बंजारा पँथर पार्टी, सत्यशोधक ओबीसी परिषद, प्रबुद्ध युवा परिवर्तन मंचने आंदोलनात सहभाग घेतला होता.

The government should conduct a caste-wise census of OBC     यावेळी ग. ह. राठोड, अंबादास रगडे, रतनुकमार पंडागळे, कीर्ती शिंदे, सरस्वती हरकळ, प्रा. सुदाम चिंचाणे, प्रा. नवनाथ गोरे, प्रा. प्रभाकर गायकवाड, अशोक पगार, सुग्रीव मुंडे, रोहिदास पवार, राजू साल्पे, किशोर शेलार, उद्धव थोराईत, निशांत पवार, एकनाथ त्रिभुवन, टी. एस. चव्हाण, किशन पवार, पंडितराव तुपे, रवि तायडे, महेश निनाळे यांची भाषणे झाली. विष्णू वखरे यांनी आभार मानले. यावेळी महादेव डांबरे, विष्णू बचाटे, कांता बचाटे, कचरू जाधव, संजय जाईबहार, देवराज दराडे, प्रा. वसंत हरकळ, कीर्तीलता पेटकर, शकिला पठाण, संदीप घोडके, रामभाऊ पेटकर, मिर्जा अब्दुल कय्युम नदवी, जयश्री शिर्के, शाहीर उत्तम मस्के, चंद्रकांत पेहरकर, कालिदास भांगे, अबुल सत्तार, दिलीप हरेगावकर, गजानन पालवे हे सहभागी होते.

भारतीय पिछडा (ओबीसी) संघटना

     मंडल दिनानिमित्त भारतीय पिछडा ओबीसी शोषित संघटनेच्या वतीने फुले दांपत्याच्या व डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करुन पेढे वाटून आनंद व्यक्त केला. ओबीसी लोकसंख्या जाणीवपूर्वक कमी दाखवल्यामुळे शैक्षणिक व नोकऱ्यातील आरक्षणालाही फटका बसू शकतो. त्यामुळे ओबीसींची खरी लोकसंख्या जाणून घेण्यासाठी २०२२ च्या जनगणनेमध्ये ओबीसीचा कॉलम वाढवावा व जातनिहाय जनगणना करावी, केंद्र सरकार करत नसेल तर राज्य सरकारने ती करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एस जी माचनवार, विभागीय अध्यक्ष प्रा. सुदाम चिंचाने, विभागीय सचिव डॉ कालिदास भांगे, डॉ देवराज दराडे, डॉ वसंत हारकळ, डॉ प्रभाकर गायकवाड, डॉ राजू पोपळघट, डॉ रामकिशन मुंडे, जनार्दन कापुरे, अमोल वाघमारे, जगन अंभोरे, सरस्वती हारकळ आदींची उपस्थिती होती.

Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209