ओबीसी वसतिगृहासाठी सप्टेबरमध्ये आंदोलन, संविधान वाचविण्यासाठी पुढे यावे लागेल मंडल यात्रा पुढच्या वर्षी देशभर निघायला हवी
नागपूर : ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी विद्याथ्यांना 'मंडल आयोगाबाबत जागृती करीत त्यांना त्यांचे अधिकार आणि हक समजावून सांगण्यासाठी 'मंडल दिनानिमित्त विदर्भातील सात जिल्ह्यात 1 ऑगस्ट रोजी काढण्यात आलेल्या मंडल यात्रेचा मंडल दिनी रविवारी समारोप झाला. यानिमित्ताने सेवादल महाविद्यालय सक्कारदरा ( नागपूर ) येथे आयोजित कार्यक्रमात मंडल आयोगाची जाणिव जागृती विदर्भात करून देणारे वरिष्ट सामाजिक कार्यकर्ते यांचा स्मृतीचिन्ह देऊन आयोजकांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष इंजि.प्रदिप ढोबळे म्हणाले की, आपली लढाई ही फुले, शाहू, आंबेडकर, पेरीयार यांच्या विचारांची लढाई असून ओबीसींच्या हितासाठी ज्या दिवशी मंडल आयोगाची घोषणा झाली तो मंडल दिवस म्हणजे ओबीसी समाजाच्या स्वातंत्र्याचा खरा दिवस असल्याचे विचार ओबीसी सेवासंघाचे अध्यक्ष इंजि. प्रदिप ढोबळे यांनी अध्यक्षस्थानावरुन बोलताना व्यक्त केले. आमच्या न्यायहक्काची यात्रा म्हणजे मंडल यात्रा होय या यात्रेशिवाय आमच्या विकासाची दुसरी यात्रा नाही हे ओबीसीनी जानूण घेणे काळाची गरज झाली आहे.
समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष इंजि. प्रदीप ढोबळे होते. तर स्वागताध्यक्ष म्हणून सेवादल महिला महाविद्यालयाचे अध्यक्ष संजय शेंडे उपस्थित होते. मंचावर उमेश कोराम, डॉ. ज्ञानेश्वर गोरे, बळीराज धोटे, प्रा. ज्ञानेश वाकुडकर, दिनानाथ वाघमारे, नितेश कराडे, खेमेंद्र कटरे, अशोक लंजे, प्रफुल्ल गुल्हाने, श्रावण फरकाडे, प्रा. रमेश पिसे, डॉ. एन. डी.राऊत, अँड डॉ. अंजली साळवे, विलास काळे, ईश्वर बाळबुध्दे, ज्ञानेश्वर रक्षक, प्राचार्य संध्या राजूरकर, गोपाल सेलोकर, भैय्याजी लांबट, पंकज पडोळे, प्रा.अनिल झाके आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागताध्यक्ष संजय शेंडे म्हणाले की ओबीसी आरक्षणाच्या माध्यमातून मुळापर्यंत जाऊन तो हिसकावून घेण्याचा प्रयत राहणार आहे. मात्र मंडल यात्रेने गावागवापर्यंत पोचून जेकामकेले त्यामुळे ओबीसींना वास्तविक परिस्थीतीच जाणिव करुन समाजाला प्रामाणिकपणे जागृत करण्याचे काम या यात्रेतून खर केले आहे.
दिनानाथ वाघमारे यांनी यात्रेच्या संयोजनाबद्दल माहिती देत आता कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून ओबीसींच्या न्याय मागण्यासाठी आंदोलनात्मक भूमिका जाहिर करावी लागणार आहे. यावेळी ज्ञानेश्वर गोरे, ज्ञानेश वाकुडकर, बळीराज घोटे, नितेश कराडे, यात्रेचे सयोजक उमेश कोराम, प्रा. रमेश पिसे, अँड. अंजली साळवे यांची भाषणे झाली. सत्कारमूर्ती प्रा. नामदेवराव जंगठे, प्रा. श्याम झाडे, भाकराव राऊत, शैल जैमोनी, यामीनी चौधरी, संध्या राजुरकर, सुनिता काळे, नुतन माळवी, सध्या सराटकर, छाया कुरुकटर, पांडुरंग काकडे, गोविंद वरवाडे, डॉ. गुरुदास बेडेवार, अशोक चोपडे, विजय बाभुळकर, यशवंत सराटकर, अनुज हुलके आदिंचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. समारोप कार्यक्रमाला ओबीसी बहुजन चळवळीतील बंधु-भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते. आयोजनासाठी ओबीसी युवा अधिकार मंचचे खेमेंद्र कटरे, मुकुंद आडेवार, धिरज भिसीकर, संजीव भुरे, पियुष आकरे, वंदना बनकर, प्रा.अनिल डहाके, कैलास भेलावे, कृतल आकरे, राजेश्वरी कोंपले, सुदर्शना गभणे, तनिष्का नागोसे, स्वाती अंडेवार, रंजना सुरजुसे आदिनी सहकार्य केले. प्रास्तविक मुकुंद अडेवार यांनी केले. तर संचालन संतोष मालेकर व वंदना बनकर यांनी केले तर आभार खेमेंद्र कटरे यानी मानले. कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रगिताने व शेवट संविधान उद्देशिका वाचनाने झाली.