भंडारा येथे मंडल यात्रेचे स्वागत व जनप्रबोधन

     भंडारा - मंडल दिनानिमित्त पूर्व विदर्भातील सात जिल्ह्यात दि.१ ते ७ ऑगस्ट २०२२ दरम्यान मंडल यात्रेचे आयोजन करण्यात आले. यात संविधान चौक नागपूर येथून यात्रेचा शुभारंभ झाला. भंडारा, गोदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ व नागपूर येथून मार्गक्रमण करत दि.७ ऑगस्टला नागपूर येथे समारोप होईल. भंडारा येथे यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. त्रिमुर्ती चौकात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला माल्यापी व अभिवादन करून शहरात बाईक रॅली काढण्यात आली. यात ओबिसी कार्यकर्ते व युवावर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले. जय ओबिसीजय संविधान, जय भारत, ओबिसींची जात निहाय जनगणना झालीच पाहिजे, जिनकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी अशा घोषणा देत रॅली गांधी चौक भंडारा येथे पोहचली, म. गांधी व महात्मा फुले यांच्या पुतळ्यांना माल्यार्पन करण्यात आले. इंद्रराज सभागृह, सार्वजनिक वाचनालय भंडारा येथे मंडल आयोग जनप्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

Bhandara Jilla Mandal Yatra OBC Jati janganana     या कार्यक्रमाचे उद्घाटक मानसोपचार तज्ञ भडारा डॉ.रत्नाकर बांडेबुचे, अध्यक्ष ओबिसी जनगणना परिषद समन्वयक बाळकृष्ण सार्वे, प्रमुख मार्गदर्शक बळीराज धोटे, उमेश कोरराम, डॉ.योगेश जिभकाटे, संजीव बोरकर, योगेश शेंडे, प्रभाकर वैरागडे, दिनानाथ वाघमारे, संदानंद ईलमे, अनिता बोरकर, बनकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पन करुन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जि.अध्यक्ष ओबिसी सेवा संघाचे गोपाल सेलोकर यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांचे ग्रंथभेट देवून स्वागत करण्यात आले. मंडल आयोगाच्या आंदोलनात योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांना 'मंडल सन्मान चिन्ह' देवून गौरविण्यात आले. मंडल सेनानी म्हणून संजय भिवगडे, इंजि.रुपचंद रामटेके, गजानन पाचे, कॉ.हिवराज उके,सदानंद ईलमे,रत्ना ईलमे, राजाभोज मेश्राम, वामनराव चांदेवार यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओबिसी सेवा संघ, ओबिसी जनगणना परिषद व युथ फॉर सोशल जस्टीस भंडारा यांनी सहकार्य केले.

    कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गोपाल देशमुख यांनी केले तर आभार पंकज पडोळे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करुन करण्यात आली.

    कार्यक्रमाला प्रामुख्याने रोशन उरकुडे, रमेश शहारे, मैय्याजी लांबट, ईश्वर निकुडे, वसंता काटेखाये, राजेश देशमुख, दिलीप गभणे, मनोहर निरगुळकर, विनोद राठोड, विलास जगनाडे, परसराम बारई, मनोज बोरकर, मंगला वाडीभस्मे, के झेड.शेंडे, डॉ.जयश्री सातोकर, वृंदा गायधने, भगीरथ धोटे, वामन गोधुळे, प्रा.उमेश सिंगनजुडे, डॉ.आशिष माटे, अरुण जगनाडे, सुभाष पाल, सुरेश वैरागडे, केशव हुड, हर्षिक अंबादे, श्रीकृष्ण पडोळे, आयुष चिमुरकर, बंटी चने, राहुल पचारे, प्रणय चिंचेकार, विशाल राखडे, अक्षय लुटे, अंकुश पंचबुध्दे, सुशील तिजारे, आशीष कडव, सुधाकर मोथलकर, प्रशांत मते, सेजल सार्वे, आचल कडव, स्नेहा मते, श्रीकृष्ण बागडे, राज बालपांडे, मोनल मोहनकर, सीम बाते, प्रणाली तरारे, वहीद बाबर यांनी सहकार्य केले.

 

Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209