"केंद्र सरकारने ओबीसी तसेच सर्व जातनिहाय जनगणना केली पाहिजे" तसेच "राज्य सरकारने जिल्हास्तरावर ओबीसी,व्हीजेएनटी,एसबीसी विद्यार्थ्यांसाठी घोषित केलेली ७२ वसतिगृह त्वरित सुरू केली पाहिजे" या प्रमुख मागण्या घेऊन मंडल यात्रा निघाली आहे. या मंडल यात्रेचे यवतमाळ येथे आज ५ आँगस्ट रोजी आगमन झाले.
यवतमाळ :- येथे सायंकाळी पाच वाजता" मंडल यात्रेचे स्वागत करण्यात आले आणि जाहीर सभा घेण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर गोरे, प्रमुख अतिथी विलास काळे, डॉ. दीपक शिरभाते, उत्तम गुल्हाने, प्रा. सविता हजारे जिल्हाध्यक्ष प्रमोद राऊत, ॲड. अरुण मेत्रे, सुनीता काळे, यवतमाळ नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते चंदू चौधरी हे मंचावर उपस्थित होते. सभेमध्ये मंडल यात्रेचे संयोजक उमेश कोराम,सतीश मालेकर,व्यक्त्यांनी ओबीसी बांधवांना मार्गदर्शन केले. वंदना वनकर, कृतल आकरे, धिरज भिसिकर, संजीव भुरे व पियुष आकरे मनीष गिरडकर.आदी मंडळ यात्रेसोबत मान्यवर आले होते.
आपल्या हक्क व अधिकाराच्या लढाईसाठी निघालेल्या मंडल यात्रेचे स्वागत करण्यासाठी आणि होणाऱ्या सभेसाठी अंकूश वाकडे, दीपक नगराळे, रवी श्रीरामे, अशोक पावडे, ज्ञानेश्वर रायमल, अशोक मोहुरले, राजेश गुल्हाने, प्रथमेश काळे, अशोक भांडारकर, वासुदेव खेरडे, दिलीप बेलखेडे, विनोद इंगळे, प्रमोद राऊत, लक्ष्मीकांत लोळगे, नितीन देहंकर, इंजि. संतोष झेंडे, मायाताई गोरे, ॲड. संजीवनी चरडे, शशिकांत फेंडर, माधुरी फेंडर, रमेश गिरोलकर, प्रफुल खेडकर, शुभांगी मालखेडे, कांचन जुमनाके, समता दूपारे, उषा उके, सावन मडावी, विजय मालखेडे कल्याणी मादेश्वर रवी नागरिक कर डॉ. संजय ढाकुलकर, अजय किनिकर, प्रियंका गोरे, अनिता गोरे, वैशाली फुसे, अदीथी फुसे, कांचन सांगळे, भास्कर देशमुख, गजानन गुल्हाने, ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी समाजातील बांधवांनी शेकडोंच्या संख्येने उपस्थिती दर्शवली. मंडल यात्रेचे स्वागत आणि सभेच्या आयोजनात ओबीसी ओबीसी जनमोर्चा, भारतीय पीछडा ओबीसी संघटन, सत्यशोधक महिला विचार मंच च्या ओबीसी समन्वकांनी महत्वाची भूमिका स्विकारली.