ओबीसी सेवा संघ जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने रविवार दिनांक 31.7.22 रोजी ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत झाल्याबद्दल व ओबीसी समाजामधील विशेष सत्कार समारंभ सोहळा संपन्न झाला. यावेळी कु. ऐश्वर्या सातार्डेकर ही सी. ए. परीक्षेमध्ये चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाल्याबद्दल तसेच श्री दिलीप सुतार साहेब यांची P.S.I पदी निवड झाल्याबद्दल व सौ रिया सुतार राहणार फोंडा यांची व्यसनमुक्ती कार्यातील उत्कृष्ट यशाबद्दल ओबीसी सेवा संघ यांच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ओबीसी सेवा संघाचे केंद्रीय सदस्य श्री बळवंत सुतार साहेब, श्री प्रताप क्षीरसागर साहेब ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष श्री चंद्रकांत कांडेकरी, उपाध्यक्ष श्री आकाराम कुंभार, कार्याध्यक्ष श्री कृष्णात लोहार (दानोळीकर ), सचिव श्री अशोक सातुसे व ओबीसी बांधव भगिनी व मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. साखर पेढे वाटून कार्यक्रमाची सांगता झाली. सर्वजण उपस्थित राहिला बद्दल सर्वांचे आभार श्री चंद्रकांत कांडेकरी ( जिल्हाध्यक्ष - ओबीसी सेवा संघ कोल्हापूर ) यांनी मानले.