जातीपातीच्या कुंपणामुळे मुस्कटदाबी - जैन साहित्य संमेलनात विश्वास पाटील यांची खंत

     सोलापूर, दि.२९. जात, पंच, धर्म यापेक्षा मी सर्वप्रथम भारतीय आहे, हे सांगण्याचे दिवस गेले आहेत. या जातीपातीच्या कुंपणामुळेच माणसांची मुस्कटदाबी होते. ही खूप वेदनादायी असल्याची खंत ज्या कादंबरीकार डॉ. विश्वास पाटील यांनी व्यक्त केली. शुक्रवारी, येथील हुतात्मा स्मृती मंदिरात २५ व्या अखिल भारतीय मराठी जैन साहित्य संमेलनाचे उदघाटन डॉ. पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, राजकारण हे विनाश पावणारे असून साहित्य हे अविनाशी आहे. या राज्यात किती राज्यपाल, मुख्यमंत्री होऊन गले लोकांच्या स्मरणात राहणार नाही. मात्र संत ज्ञानेश्वर माउती, तुकोबाराय,  यांच्यापासून साहित्यिकांना जो लाभ मिळतो तो परिस्‍पर्श असतो. ही देवी देणगीच आहे. राष्ट्रपुरुषांच्या राष्ट्र चळवळी आणि साहित्यिकांनी देश उभा केता, राष्ट्रउभारली आणि समाजबांधणीमध्‍ये त्यांचे फार मोठे योगदान आहे. साहित्यिकांनी भाष्यचित्र आणि आभासचित्र बारकाईने टिपले पाहिजे. वरवरचे अभ्यास न करता खोलात जाऊन संशोधन करावे. साहित्यात प्रतिभेचे पंख असतात. त्यामुळे खोलीत बसून साहित्य निर्मिती करण्यापेक्षा जगाच्या विराट वादळाचे निरीक्षन करावे. पुस्तकी ज्ञानातून खरा इतिहास दाखविला गेलाच नाही. त्यामुळे साहित्यिकांनी शिवकालीन खरा इतिहास समोर येण्यासाठी इतिहासाच्या तळाशी जाण्याचा प्रपत्ल करावा, असे ते म्हणाले. जैन साहित्यामध्ये अनेक साहित्यिकांनी साहित्याची भर घातल्याचा उल्लेख पाटील यांनी केला.

 Jain Sahitya Sammelan Solapur   संत साहित्याचे अभ्यासक उल्‍हास पवार म्हणाले, संत ज्ञानेश्वर माउली, संत तुकाराम महाराज, भगवान गौतम बुद्ध, भगवान महावीर या संतांनी तसेच महात्मा गांधी यांनी अखिल विश्वाला गवसणी घातली. विश्वच माझे म्हणून त्यांनी जगाला शांती, करुणा, प्रेमाचा संदेश दिला. भगवान महावीरांनी जगाला मानवतेचा संदेश दिला. जीवनातीत शहाणपण महावीरांच्या तत्‍त्वज्ञानात आहे. मात्र आज त्यातील शब्दार्थ, भावार्थ आणि मतितार्थ समजून न घेता संघर्ष चालू असून धार्मिक आणि जातीय संघर्षात आज देश अडकता आहे. मराठी साहित्यात जैन साहित्याचेही योगदान असून जैन विचारांचा वारकरी म्हणून आपण यामध्ये सहभागी झाल्याचे पवार यांनी सांगितले.

    प्राचीन मराठीचे अभ्यासक सदानंद मोरे यांनी सोलापुरातील जैन परंपरेची अनेक वैशिष्टये सांगितलो. जैन समाज ज्या ज्या ठिकाणी आहे. तेथील भाषा व संस्कृतीचा अंगीकार करून त्या भाषेची प्रतिष्ठाच वाढविल्याचे ते म्हणाले. स्वागताध्यक्ष मिलिंद फडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मावळते अध्यक्ष प्रा. गजकुमार शहा यांनी डॉ. रावसाहेब पाटील यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे बहाल केली.

    याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते संमेलनाध्यक्ष डॉ. रावसाहेब पाटील यांची गंधकुटी', मुबारक शेख यांची 'गाथा कर्मवीरांची', प्रा. नरेश बदनारे यांचा विचारमंथन आणि व्यक्तिवेध' तसेच संजय सोनवणी यांच्या शोध भारत नावाचा' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भारतीय ज्ञानपीठाचे साहू अखिलेश यांनी संमेलनास व्हिडिओच्या माध्यमातून पाठविलेला संदेश ऐकविण्यात आला.

    यावेळी व्यासपीठावर संजीव पाटील, नंदकिशोर शहा, अचल शाहा, सुरेखा शहा, सरिता कोठादिया, कल्याण गंगवाल, जे.ए. पाटील, मिहोर गांधी, सुहास शहा, श्रीधर हेरवाडे, लीला शहा आदी उपस्थित होते. मसाप साहित्य परिषद सोलापूर शाखेच्यावतीने अॅड. जे.जे. कुलकर्णी, दना सुरवसे आणि किशोर चंडक यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार केला. संगीता बोडकर यांनी सादर केलेल्या णमोकार मंत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनम पाटील आणि सुवर्णा कटारे यांनी केले.

Satyashodhak, obc, Mahatma phule, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Youtube Educational Histry
यह वेबसाईट फुले, शाहू , आंबेडकर, बहुजन दार्शनिको के विचार और बहुजनसमाज के लिए समर्पित है https://phuleshahuambedkars.com

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209