राष्ट्रवादी काॅंग्रेस ओबीसी सेल च्या राज्यातील प्रमुख पदाधिकारींसाठी खंडाळा येथे दोन दिवसीय स्नेह संम्मेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राज्यातील 27 जिल्ह्यातून प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सुंदर अश्या निसर्गरम्य वातावरणा सोबतच स्नेह भोजनाचा आनंद घेत पदाधिकारींनी उत्तम वक्ता कसा बनावा यासाठी प्रशिक्षण शिबिराचा देखिल उपभोग घेतला.
ओबीसींचे राजकिय आरक्षण टिकविण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेली सकारात्मक भुमिका, राजकिय आरक्षणासाठी(जातिनिहाय) जनगणना होणे, ओबीसींचा डाटा हा योग्य पध्दतिने तयार करणे व येणा-या काळात पुन्हा दुसरा मंडल आयोगाचा लडा लढावा लागणार या विषयांवर आत्मचिंतन झाले.
ओबीसींच्या राजकिय आरक्षणाचा लढा अजून संपलेला नाही तर हा लढा आता देशव्यापी करावा लागणार आहे, असे मत राज्य समन्वयक आणि कोकण प्रभारी राज राजापूरकर यांनी व्यक्त केले. ओबीसी सेल च्या प्रत्येक पदाधिकारी पक्षाच्या पाठीशी ऊभा राहिल्यामुळे आपल्यासारख्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला पवार साहेब, अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रियाताई सुळे, छगन भुजबळ साहेब यांनी मान सन्मान दिला असे मत प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी व्यक्त केले. ओबीसी सेलच्या कार्यकर्त्यांनी संघटनात्मक कार्यासोबत एक उत्तम वक्ता बनणे देखिल गरजेचे आहे.असे मत समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापू भुजबळ यांनी व्यक्त केले.
ओबीसी सेलच्या कार्यकर्त्यांनी एक मोठी चळवळ उभी करण्याची गरज आहे, असे मत सेलचे उपाध्यक्ष हिराचंद बोरकुटे यांनी मांडले. सदर कार्यक्रमातून एक नवी प्रेरणा, उर्जा आणि आत्मविश्वास घेऊन महाराष्ट्रातील ओबीसींच्या या तोफा पुढच्या निवडणुकांच्या रणसंग्रामासाठी सज्ज झाल्या. राज्यभरातून आलेल्या ओबीसी योध्दांचे मनापासून आभार मानण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन उत्कृष्ठ रित्या अतुल राऊत, सचिन बोडके, सलिम बेग, असिफ खलिफे आणि रूपेश वाघ यांनी केले.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Periyar, Bahujan